kim kardashian  sakal
Premier

Kim Kardashian: किमचा हट्ट झाला पूर्ण ! मुंबईच्या रिक्षामध्ये फिरतेय अंबानींची पाहुणी; बहिणीसोबत शेअर केला व्हिडिओ

Kim Kardashian In Autorickshaw: अंबानींच्या लग्नसोहळ्याला मुंबईत आलेली किम कार्दशियन हिचा मुंबईच्या रिक्षेमधून फिरण्याचा हट्ट अखेर पूर्ण झाला आहे.

Payal Naik

सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाचा लग्नात कशाशीही कमी ठेवली नाहीये. या लग्नासाठी मोठमोठ्या पाहुण्यांना आमंत्रणं गेली आहेत. बड्या नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत ते पंतप्रधानांपासून ते मोठ्या कंपन्यांच्या सीईओपर्यंत अनेक जण या लग्नाला उपस्थित राहणार आहे. यातील काही पाहुणे आज १२ जुलै रोजी मुंबईत दाखल झाले. या पाहुण्यांपैकी एक म्हणजे लोकप्रिय हॉलिवूड स्टार किम कार्दशियन. तिने शेअर केलेल्या व्हिडिओने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंबानींची ही पाहुणी मुंबईत चक्क रिक्षामधून फिरते आहे.

kim kardashian

किम एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. ती स्वतःचा सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँडदेखील आहे. ज्याची किंमत अब्जावधींमध्ये आहे. टाइम्स मॅगझीनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये तिचा समावेश आहे. आता किम सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारतात येण्यापूर्वी तिने एक इच्छा व्यक्त केली होती. तिला मुंबईत आल्यावर मुंबईच्या प्रसिद्ध ऑटोरिक्षामध्ये बसून फोटोशूट करायचं होतं. यासाठी तिने जवळपास हट्टच धरला होता. ज्यासाठी प्रोडक्शन हाउसची पळापळ सुरू होती. आता किमची ही इच्छादेखील पूर्ण झाली आहे.

kim kardashian

किमचं फोटोशूट लालबाग परळ, सिध्दीविनायक मंदिर या ठिकाणी होणार होतं. हे शूट होईल की नाही ठाऊक नाही मात्र त्यापूर्वी किमने तिची रिक्षातून फिरण्याची इच्छा पूर्ण करून घेतली आहे. तिने तिच्या बहिणीसोबतचा एक व्हिडिओ स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किम आणि तिची बहीण क्लोई रिक्षात बसलेल्या दिसत आहेत. त्या दोघी ताज हॉटेलच्या इथे फेरफटका मारताना दिसत आहेत. किम आणि तिची बहीण रिक्षात बसून खूप आनंदी दिसत आहे. बहिणीच्या व्हिडिओसाठी किम पोज देताना दिसतेय. यासोबतच किमने तिचे इतरही फोटो स्टोरीवर शेअर केले आहेत. भारतात आल्यावर तिचं कशाप्रकारे स्वागत करण्यात आलं हे तिने दाखवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT