Kiran Mane  Esakal
Premier

Kiran Mane : "आयुष्य अनप्रेडिक्टबल असतं" ; किरण माने रुग्णालयात दाखल , पोस्ट शेअर करत म्हणाले...

Marathi Actor Kiran Mane Hospitalised : मराठी इंडस्ट्रीमधील चर्चेत राहणारे अभिनेते किरण माने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात पोस्ट शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Kiran Mane Post : मराठी इंडस्ट्रीमधील कायम चर्चेत राहणारे अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते किरण माने सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहेत. ते कायमच आसपास घडणाऱ्या घटनांवर रोखठोक मतं मांडत असतात. याबरोबरच ते त्यांची राजकीय मतं सुद्धा सगळ्यांबरोबर शेअर करतात. पण किरण मानेंना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी शेअर केली.

"काल दुपारपर्यंत फिट, तंदुरूस्त, हसतखेळत होतो...आज हाॅस्पीटल... सलाईन..इंजेक्शन्स आणि प्रचंड असह्य वेदना...आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ! अर्थात, यावरही मात करून यातून बाहेर पडेन. फिकीर नाॅट." अशी पोस्ट शेअर करत किरण यांनी त्यांच्या आजारपणाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. मात्र त्यांच्या आजारपणाचं कारण मात्र अजून त्यांनी उघड केलं नाहीये. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

किरण माने सध्या सन मराठीवरील 'तिकळी' या मालिकेत काम करत आहेत. एका अंधश्रद्धेविरोधात एका मुलीने दिलेला लढा यावर या मालिकेची गोष्ट आधारित आहे. ते बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनमध्येही सहभागी झाले होते. त्यांचा गेम बराच चर्चेत होता. त्या आधी त्यांनी मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील मालिकेत काम केलं होतं पण सहकलाकारांबरोअबर झालेल्या वादामुळे त्यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. याबाबत किरण यांनी सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट शेअर केल्या होत्या. अखेर ती मालिका कमी टीआरपीमुळे बंद झाली.

किरण यांनी गेल्यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. त्यांनी निवडणुकीतही शिवसेना पक्षाविषयी बराच प्रचार केला होता. उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यांचं कौतूक केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT