Kiran Mane Esakal
Premier

Kiran Mane: मी ब्राह्मण्यवाद्यांना नडतो, 'निळूभाऊ- अशोकमामां'चा व्हिडिओ शेअर करत किरण मानेंचा चिमटा

Kiran Mane criticised Brahmins : अभिनेते किरण माने यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वादावर टीका केली. काय म्हणाले ते जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेते किरण माने त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. फक्त मनोरंजनच नाही तर समाजकारण, राजकारण, संत साहित्य, सामान्य ज्ञान यावर किरण माने भरभरून बोलत असतात. त्यांना खटकणाऱ्या गोष्टींवर ते कायमच व्यक्त होतात. नुकतंच त्यांनी ब्राह्मण्यवादावर केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

अभिनेते किरण माने यांनी नुकतीच एक रील शेअर केली. या रील मध्ये "ब्राह्मण श्रेष्ठ होता है" असं एक माणूस घोषणा देत होता. यावर किरण माने यांनी त्यांच्या शैलीत टीका केली. किरण यांनी त्या भाषणाचे हलकीशी झलक शेअर करत पुढे अशोक मामा आणि निळू फुले यांचा एक गाजलेला सीन जोडलाय. या सीनमध्ये ते दोघं जातीवादावर टीका करतात असं दाखवण्यात आलं आहे. किरण यांनी शेअर केलेला हा सीन गाव तसं चांगलं या सिनेमातील आहे.

सोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये किरण म्हणाले,"मी कायम सांगतो माझा ब्राह्मणांना विरोध नाही. माझ्या आयुष्याला दिशा दाखवणारे कितीतरी ब्राह्मण आहेत. कितीतरी ब्राह्मण कुटूंबात मला घरातला एक सदस्य मानतात. मी ब्राह्मण्यवादाला विरोध करतो.

'आम्हीच श्रेष्ठ' हा माज असलेला म्हणजे ब्राह्मण्यवादी. त्यांना नडतो मी. सगळे ब्राह्मण ब्राह्मण्यवादी नसतात. फरक आहे. हा श्रेष्ठत्वाचा माज कुठल्याही जातीतल्याला असला तरी तो ब्राह्मण्यवादीच !

असो. पण शेवटी निळूभाऊंनी आणि अशोकमामांनी जी थोबाडीत लावलीय यांच्या... त्याला तोड नाय भावांनो.😜😜😜😂😂😂😂"

https://www.facebook.com/share/v/S6SCHdsQQTJqqYsv/?mibextid=qi2Omg

किरण यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या काहींनी त्यांची साथ दिली तर काहींनी त्यांच्यावर टीका केली.या आधीही त्यांनी राजकारण आणि जातीवाद यावर भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर कित्येकदा टीकाही झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT