Kiran mane esakal
Premier

Uddhav Thackeray : "उद्धवजींनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'कॉपी पेस्ट' नाही केले!"; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kiran mane: किरण माने हे सोशल मीडियावर राजकारणाच्या संबंधित बऱ्याच पोस्ट शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

priyanka kulkarni

Kiran mane: काही दिवसांपूर्वी किरण माने (Kiran mane) यांनी राजकारणात एन्ट्री केली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला. किरण माने यांच्या राजकारण्यातील एन्ट्रीची बरीच चर्चा झाली. किरण माने हे सोशल मीडियावर राजकारणाच्या संबंधित बऱ्याच पोस्ट शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

उद्धव ठाकरेंची पोस्ट

किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'कॉपी पेस्ट' नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. समजा एखादा अभिनेता महान आहे, म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब दिसणार्‍या कलाकाराला देतात का? नाही. गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते."

"बाळासाहेबांचं नाव 'कॅश' करणं उद्धवजींना अवघड नव्हतं. "माझ्या उद्धवला सांभाळा" ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं.आपण नेहमी म्हणतो बघा. 'आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते,.तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव 'वापरणार्‍यांनी'ही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.", असंही उद्धव ठाकरेंनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नांवाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काॅंग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काॅंग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते.आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. 'जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची', हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय.हे बघा... तो त्याच्या बापाचं नांव लावतो.उसन्या बापाची गरज नाही त्याला.'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाम ही काफी है. ईषय कट. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT