Kishori Shahane  Esakal
Premier

Bigg Boss Marathi Season 5 : "वर्षाचा अपमान करणं चुकीचंच पण..." ; किशोरी शहाणेंनी देखील घेतली निक्कीची बाजू

Kishori Shahane Slammed Nikki Tamboli : अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांची कानउघाडणी केली. काय म्हणाल्या किशोरी जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Kishori Shahane Interview : बिग बॉस मराठी सीजन ५ हा खूप गाजतोय. पहिल्या आठवड्यातच या सिजनमधील वादविवाद चर्चेत राहिले आहेत. अभिनेत्री निकी तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांचं पहिल्या दोन दिवसांतच जोरदार भांडण झालं. यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. अनेकांनी निक्कीवर टीकाही केली. वर्षा यांच्या सहकलाकार आणि बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धक यांनी किशोरी शहाणे यांनी निकी आणि वर्षा यांची कानउघडणी केली आणि मोलाचा सल्ला दिला.

किशोरी शहाणे यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी किशोरी यांना यावेळी वर्षा आणि निक्कीचं जे भांडण झालं त्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर किशोरी म्हणाल्या,"अपमान करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. निक्कीसाठी हे चुकीचं आहे पण वर्षानेही आता खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असं माझं मत आहे. तिने हललं नाही पाहिजे. या गोष्टी होणार. प्रत्येकाला शेवटी दुसऱ्याला बाहेर काढायचं आहे जिंकण्यासाठी. जिंकणार कसं नाहीतर! एकमेकांचा उदो उदो तुम्ही करत बसलात तर तुम्ही जिंकणार कसे. बिग बॉस हा एक individually खेळायचा गेम आहे. तो एक मानसिकरीत्या खेळण्याचा गेम आहे. ज्यांनी या खेळाचं व्यवस्थित निरीक्षण केलं आहे त्यांना या खेळाविषयी उत्सुकता निर्माण होईल. मी पण बिग बॉस गेमची आता फॅन झाली आहे. " असे विचार किशोरी यांनी मांडले.

किशोरी यांनी बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये सहभाग घेतला. बिग बॉस मराठीच्या फायनल पर्यंत त्यांनी मजल मारली होती पण नंतर त्यानं एलिमिनेट झाल्या. कोणताही वाद न करता पण वेळोवेळी त्यांच्याविरुद्ध झालेल्या अन्यायावर आवाज उठवत किशोरी यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. एक उत्तम स्पर्धक म्हणून त्यांचं कौतुक झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT