shahrukh khan  sakal
Premier

Shah Rukh Khan: बाबो! शाहरुख खानने अनंत राधिकाला लग्नात दिली 'ही' महागडी भेट; किंमत वाचून उंचावतील भुवया

Shah Rukh Khan Gift To Anant Radhika: शाहरुख खानने अनंत अंबानी आणि राधिकाला त्यांच्या लग्नात दिलेल्या आहेराची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Payal Naik

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधली. हा विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. ना भूतो ना भविष्यती असा हा सोहळा होता. १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे हा विवाह पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्न, हळदी, मेहंदी, वरात, पूजा असे अनेक कार्यक्रम पार पडले. हॉलीवूडपासून अनेक बड्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी या लग्नाला झाडून हजेरी लावली होती. मात्र या नवदाम्पत्याला कुणी काय आहेर दिला हे तुम्हाला ठाऊक आहे का?

या सोहळ्यात अभिनेता सलमान खान यानेही हजेरी लावली होती. त्याने अनंत आणि राधिका यांना १५ कोटींची स्पोर्ट्स बाइक गिफ्ट केली. तर बच्चन कुटुंबीयांनी या जोडीला ३० कोटींचा एक हिऱ्यांचा हार देऊ केला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अनंत आणि राधिकाला २० कोटींची कस्टमाइझ रोल्स रॉयस देऊ केली. या लग्नात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी ९ कोटींची मर्सिडीज कार गिफ्ट केली आहे.तर अक्षय कुमारने देखील कोविडच्या चर्चांमध्ये या लग्नाला हजेरी लावली होती. त्याने अनंतला ६० लाखांचं पेन गिफ्ट केलं आहे.

यात अभिनेता शाहरुख खान याने अनंत राधिकाला दिलेलं गिफ्ट सगळ्यात खास ठरलं आहे. शाहरुख आणि अंबानी कुटुंबियांचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्याने या जोडीला सगळ्यात महागडं गिफ्ट दिलं आहे. अनंत राधिकाला शाहरुखने तब्बल ४० कोटींचं गिफ्ट दिलं आहे. त्याने या नवदाम्पत्याला ४० कोटींचं आलिशान घर भेट केलं आहे. हे घर त्याने भारतात नाही तर फ्रान्स येथे आहे. त्यामुळे ही भेट या दोघांसाठी नक्कीच खास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT