ankita walawalkar  esakal
Premier

बिग बॉस मराठीमध्ये एंट्री करताच कोकण हार्टेड गर्लने दिली प्रेमाची कबुली, म्हणते- आपण लग्न करायचं ठरवलं अन्

Ankita Walawalkar Confesses Love: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे. आता तिने आपल्या प्रेमाचीही कबुली दिली आहे.

Payal Naik

Kokan Hearted Girl boyfriend: सोशल मीडियावरील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर अंकिता वालावलकर हिने 'बिग बॉस मराठी ५' मध्ये एंट्री केली आहे. या सीझनमध्ये कोकण हार्टेड गर्ल राडा घालायला सज्ज झाली आहे. आपण इथे कोणताही गेमप्लॅन घेऊन आलेलो नाही पण ट्रॉफी घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करू असं ती म्हणाली. मात्र एकीकडे तिने बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे तर दुसरीकडे तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने एक पोस्ट करत तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे. अंकिताने त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं ठरवलं आणि तेव्हाच तिला बिग बॉस मराठीची ऑफर अली. तेव्हा या कार्यक्रमासाठी त्याच व्यक्तीने तिला हिंमत दिली असंही तिने लिहिलं.

ही पोस्ट अंकिताने अंकिताने बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी लिहिली होती. आता ती पोस्ट तिच्या टीमने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, 'डिअर कोकण हार्टेड बॉय, रात्री २ वाजता यशस्वी भव: हे गिफ्ट घेऊन येणं रोमँटिक समजू की काळजी? कारण बिग बॉसमधे जाण्यासाठी २ दिवस बाकी उरलेत फक्त.. खरंतर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलस.तुझे शब्द माझी ताकद आहेत. तु हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघुन आई पण निश्चिंत आहे.तुझी सगळी वाक्य लक्षात ठेऊन हया नवीन प्रवासाला सुरुवात करतेय.'

तिने पुढे लिहिलं, 'जेव्हा लग्न करु अस आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली,माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास “माझा विचार नको करूस ,मी आजही आहे ,उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा” ”लवकर ये पण जिंकुन ये,आलीस की लग्न करु फक्त जशी आहेस तशीच वाग,जिंकण्यासाठी खोटं वागु नकोस, हरलीस तरी चालेल“ हे सगळं लक्षात ठेऊन जातेय,लवकरच येईन पण छान राहुन येईन,तू तयारीला लाग 😅तुझ्यासोबत १९५ देश फिरायचे आहेत. फुलांची खूप आठवण येईल. येते. तुझीच, गुणी पोरगी.'

अंकिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. चाहते तिच्यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT