kranti redkar  esakal
Premier

तेव्हा क्रांती रेडकरला यायचे धमकीचे फोन, समीर वानखेडेंनी सांगितली परिस्थिती, म्हणाले- मुलांवरून घाबरवलं की...

Sameer Wankhede Praises Kranti Redkar : लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती समीर वानखेडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सांगितली आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. 'जत्रा' या चित्रपटातून ती घराघरात पोहोचली. अनेक मालिका, चित्रपटात झळकलेली क्रांती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. मात्र गेल्या वर्षी तिने आणि तिच्या कुटुंबाने एका मोठ्या संकटाचा सामना केला. क्रांतीचे पती आणि एनसीबी चीफ समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग केसमध्ये अटक केली होती. त्यानंतर समीर यांच्यावरही अनेक आरोप झाले. मात्र त्या काळात क्रांतीलाही खूप मानसिक त्रास सहन करावा लागला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीर यांनी त्याबद्दल सांगितलं आहे.

घाबरवण्याकरता तिला थेट फोन करायचे

समीर आणि क्रांती यांनी नुकतीच सन मराठीवरील होऊ दे चर्चा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना समीर यांनी आपल्या पत्नीचं कौतुक केलं. तेव्हाची परिस्थिती सांगताना ते म्हणाले, 'या परिस्थितीमध्ये तीसुद्धा लढा देतेय. तिचंही कौतुक केलं पाहिजे. आता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच तिला थेट मोबाइल फोनवर धमकी वगरे ओपनली यायची आणि थेट धमक्या मुलांबद्दल, माझ्याबद्दल. माननीय सीएम साहेबांनी त्याची दखल घेतली आणि त्यानंतर जे काही कारवाई होती कायद्यानुसार ती केली त्या लोकांनी पण एक स्त्री म्हणून... किंवा ती फक्त माझी अर्धांगिनी आहे. फक्त तिला घाबरवण्याकरता तिला थेट फोनवगरे करायचे. ती सुद्धा एक स्त्री आहे. देवाच्या कृपेने ती खूप धाडसी आहे. ती परिस्थिती तिने खूप हिमतीने सांभाळली. तिचं खरंच कौतुक करायला पाहिजे.

ते पुढे म्हणाले, 'मी तर म्हणतोच ती झासीची राणी आहे. मी तर नंतर लोकांना सांगायचो की माझ्यापर्यंत तुम्ही नंतर पोहोचाल पण त्याआधी तुम्हाला माझ्या दुर्गा आणि लक्ष्मीचा सामना आधी करावा लागेल तुम्हाला.' क्रांती आणि समीर यांच्यावर तेव्हा बरेच आरोप करण्यात आले होते. तर क्रांती त्या परिस्थितीत समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur News: वादग्रस्त गावांत दुहेरी जनगणना, सीमाभागात गोंधळ; महाराष्ट्रासह तेलंगणकडूनही प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात पोलीस सुरक्षेत पेट्रोल पंपांवर इंधन तेल विक्री

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर हटके एन्ट्री, सोशल मीडियावर Viral Video

Rishabh Pant: रिषभ पंतला उपकर्णधारपदाचा फटका? निवड समिती घेणार मोठा निर्णय

Nagpur News: प्रेमविवाहानंतर १२ वर्षे संसार, पत्नी दुसऱ्यासोबत गेली; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT