Salman Khan sakal
Premier

Salman Khan: सलमान खानच्या गाडीवर हल्ल्या करण्याचा बिश्नोई गँगचा मास्टर प्लॅन उघड, पाकिस्तानातून मागवणार होते शस्त्र; चौघांना केली अटक

लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीने महाराष्ट्रातील पनवेल (Panvel) येथे सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याचा कट रचला होता.

priyanka kulkarni

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर (Salman Khan) हल्लेचा कट रचणाऱ्यांना नवी मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीने महाराष्ट्रातील पनवेल (Panvel) येथे सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याचा कट रचला होता, ज्यामध्ये पाकिस्तानातील शस्त्रास्त्र पुरवणाऱ्यानं दिलेल्या शस्त्रांचा वापर करण्यात येणार होता.

चौघांना अटक

पनवेलमध्ये अभिनेता सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील चौघांना अटक केली आहे. त्यासाठी पाकिस्तानी शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे मागवण्याची योजना होती. लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह 17 हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी ANI ला दिली आहे.

धनंजय उर्फ ​​अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ ​​न्हवी, वास्पी खान उर्फ ​​वसीम चिकना आणि रिझवान खान उर्फ ​​जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडलीय. या घटनेनंतर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. या प्रकरणी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमध्ये पकडण्यात आले, तर अनुज थापन आणि अन्य एका व्यक्तीला 26 एप्रिल रोजी पंजाबमधून ताब्यात घेण्यात आले. यामधील अनुजला थापनचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.

अनुज थापनची आई, रीता देवी यांनी 3 मे रोजी याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, त्यांच्या मुलावर पोलीस कोठडीत अत्याचार आणि छळ करण्यात आला, ज्यामुळे 1 मे रोजी लॉकअपमध्ये त्याचा मृत्यू झाला. थापननं आत्महत्या केली होती, असे पोलिसांचे म्हणणे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

Chh. Sambhajinagar: सिडको खून प्रकरण, पालकमंत्री शिरसाट माघारी फिरताच एकाचे कृत्य; प्रमोदच्या काकूला धक्काबुक्की, कानशिलात लगावली

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'बटाटा मटर ब्रेड कचोरी', सोपी आहे रेसिपी

Ajit Pawar: शेतकऱ्यांनी योग्य वेळी कर्जमाफी देऊ: उपमुख्यमंत्री अजित पवार; राष्‍ट्रवादीत अनिल देसाई दाखल, साताऱ्याच्या मातीशी आपुलकीची नाळ

Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पूर

SCROLL FOR NEXT