Premier

Ketaki Chitale : केतकी चितळेची ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, लाज कशी वाटत नाही...

''पण आज बाळासाहेबांमुळे जो काही 0.0001 टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत, येते आहे ती फक्त कीव..''

संतोष कानडे

मुंबईः अभिनेत्री केतकी चितळे हिने पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. ''लाज कशी वाटत नाही'' असं म्हणत तिने थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन टीका केली.

केतकी चितळेची पोस्ट

लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे, असे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेही मी मत देणार नव्हतेच.

पण आज बाळासाहेबांमुळे जो काही 0.0001 टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत, येते आहे ती फक्त कीव.. असं म्हणत केतकीने उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं.

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारयात्रेत इक्बाल मुसा याच्या उपस्थितीवरुन वाद निर्माण झाला आहे. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटामधला आरोपी मुसा याच्या सहभागामुळे राजकारण गरम होत आहे. त्याच अनुषंगाने अभिनेत्री केतकी चितळे हिने पोस्ट लिहिली आहे.

केतकीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर करत त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या स्टोरीमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. केतकी नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत असते. कित्येकदा तिला खालच्या स्तराच्या ट्रोलिंगला समोरं जावं लागतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT