Madhuri dixit sakal
Premier

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरीच्या लांब अन् दाट केसांचे रहस्य,'हे' खास पद्धतीचं तेल लावताच केसगळती थांबेल

Madhuri Dixit Beauty Tips: माधुरीनं तिच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना काही हेअर केअर टीप्स दिल्या होत्या. यामध्ये माधुरीनं एक तेल तयार करण्याची सोपी (Homemade Oil) पद्धत चाहत्यांना सांगितली होती.

priyanka kulkarni

Madhuri Dixit Tell Homemade Oil Recipe: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते. माधुरीचा चाहता वर्ग मोठा आहे. विविध कार्यक्रमांमधून आणि चित्रपटांमधून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसेच माधुरीचे स्वत:चे युट्यूब चॅनल देखील आहे. या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करुन माधुरी चाहत्यांना ब्युटी टीप्स देत असते. माधुरीनं तिच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना काही हेअर केअर टीप्स दिल्या होत्या. यामध्ये माधुरीनं एक तेल तयार करण्याची सोपी (Homemade Oil) पद्धत चाहत्यांना सांगितली होती. हे खास तेल माधुरी स्वत: नियमितपणे केसांना लावते. हे तेल कसं तयार करायचं? याबाबत जाणून घेऊयात...

तेल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य-

  • खोबरेल तेल - 1/2 कप

  • कप मेथी दाणे - 1 चमचा

  • 1 बारिक चिरलेला कांदा

  • कढीपत्ता - 15-20 पाने

कसं तयार करायचं तेल?

सर्वप्रथम एक कढई घ्या त्यात तेल टाका. तेल थोडे गरम झाल्यावर त्यात कांदा, मेथी, कढीपत्ता आणि तीळ घाला. हे मिश्र एका चमच्यानं हलवून घ्या. 20-30 मिनिटे हे तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. हे तेल एका काचेच्या बाटलीमध्ये गाळणीनं गाळा. त्यानंतर हे तेल दोन दिवस काचेच्या बाटलीत ठेवा.नंतर तीसऱ्या दिवशी तुम्ही हे तेल डोक्याला लावू शकता.

माधुरीनं दिलेल्या हेअर केअर टीप्स-

  • हेअर कट वेळच्या वेळी करा. त्यानं split hair निघून जातात.

  • केस कोमट पाण्यानं धुवा, केस धुताना जास्त गरम पाणी वापरु नका.

  • केस धुताना शॅम्पू फक्त केसांच्या मूळांना लावा आणि कंडिशर केसांना लावा.

  • नियमित केसांना तेल लावून मसाज करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT