Maharashtrachi Hasyajatra esakal
Premier

Maharashtrachi Hasyajatra: “वन लव्ह”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं शेअर केला कोकणातील खास व्हिडीओ

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील एका अभिनेत्यानं कोकणातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलाकारांचा चाहता वर्ग मोठा आहे. हे कलाकार सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील एका अभिनेत्यानं कोकणातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

निखिल बनेनं शेअर केला व्हिडीओ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बने यानं कोकणातील व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या “वन लव्ह…” या गाण्याचे ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहेत. याच गाण्यावरील व्हिडीओ निखिलनं शेअर केला. या व्हिडीओमध्ये नारळाची झाडं, आंबा आणि कौलारू घरं या गोष्टी दिसत आहेत. निखलनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं,“कोकणचो वन लव्ह” निखिलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

निखिल हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘बॉईज 4’ या चित्रपट रिलीज झाला होता. निखिलच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो जिंकतोय प्रेक्षकांची मनं

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक करतात. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता माळी करते. समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब आणि गौरव मोरे या कलाकारांच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कॉमेडीला प्रेक्षकांची पसंती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT