Maharashtrachi Hasyajatra ESAKAL
Premier

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची स्वप्नपूर्ती; पोस्ट शेअर करुन म्हणाला, “यासाठी केला होता अट्टाहास…”

Maharashtrachi Hasyajatra: नुकतीच प्रथमेशन एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या कार्यक्रमामधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमात अभिनेता प्रथमेश शिवलकर (Prathamesh Shivalkar) देखील काम करतो. प्रथमेशचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकतीच प्रथमेशन एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

प्रथमेशची स्वप्नपूर्ती

प्रथमेशनं नुकतीच नवी कार घेतली आहे. त्यानं महिंद्र थार ही गाडी घेतली आहे. या गाडीचे फोटो प्रथमेशनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "यासाठी केला होता अट्टाहास भाग १, महिंद्र थार ड्रीमकार, हे आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचं आई , बाबांच्या डोळ्यातला आनंद , समाधान आणि कौतुक आणि यासाठी केला होता अट्टाहास भाग २ ….. लवकरच………" प्रथमेशनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करुन अनेकांनी त्याला या नव्या गाडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमनं देखील प्रथमेशला शुभेच्छा दिल्या. प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, प्राजक्ता माळी, समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, गिरीजा प्रभू, हर्षद अतकरी, अक्षया नाईक, अभिषेक गावकर, साक्षी गांधी, इशा डे, नम्रता संभेराव,अमित फाळके या कलाकारांनी प्रथमेशच्या पोस्टला कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या.

प्रथमेशचा भाऊ रोहित हा देखील अभिनेता आहे. तो ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत काम करत आहे. तर प्रथमेश हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे करतात. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता माळी करते.समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब आणि गौरव मोरे या कलाकारांच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कॉमेडीला प्रेक्षकांची पसंती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT