vanita kharat  esakal
Premier

Maharashtrachi Hasyajatra: 'तू चीज़ बड़ी है मस्त मस्त', अक्षयच्या गाण्यावर हास्यजत्रा फेम वनिताचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, "सलमानची बहीण"

Maharashtrachi Hasyajatra: अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते.

priyanka kulkarni

Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या शोमधील अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते. वनिता ही सोशल मीडियावर देखील विविध पोस्ट शेअर करत असते. नुकताच वनितानं एक खास रिल सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिच्या या रिलनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

वनितानं शेअर केला व्हिडीओ

वनितानं 'तू चीज़ बड़ी है मस्त मस्त' या अक्षय कुमारच्या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता ही ओंकार राऊतसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला वनितानं कॅप्शन दिलं, "मस्त मस्त चीज़ कर रहे हैं, मस्त मस्त ऑस्ट्रेलिया में"

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

वनिताच्या डान्सच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,"मला वाटलं सलमान खानची बहीण नाचतीये" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "खूप छान डान्स केला"

पाहा व्हिडीओ:

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती.या दौऱ्याचे फोटो हास्यजत्रेतील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले.

वनितानं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

कबीर सिंग या हिंदी चित्रपटात वनिता खरातनं काम केलं आहे. तसेच तिनं सुंदरी, तुझेच मी गीत गाते आहे या मालिकेत काम केलं आहे. वनिताचा एकदा येऊन तर बघा हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT