maherchi sadi  esakal
Premier

Maherchi Sadi: 'माहेरची साडी' फेम विजय कोंडकेंचं 34 वर्षानंतर सिनेसृष्टीत पुनरागमन; लेक असावी तर अशी चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Maherchi Sadi: विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

priyanka kulkarni

Maherchi Sadi: ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माहेरची साडी' चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी 34 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली माहीत असलेले विजय कोंडके 'लेक असावी तर अशी' हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या रंजनासाठी घेऊन सज्ज झाले आहेत.

निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याच्या इच्छेतून आणि दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले. यशापलीकडे या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी 'लेक असावी तर अशी' हा नवा मराठी चित्रपट मी 26 एप्रिलला घेऊन येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT