Mahesh Kothare annouces to create AI version of Laxmikant Berde 
Premier

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

Zapatlela 3 Update: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारेंच्या 'झपाटलेला ३' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे दिसणार आहेत. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत याना AI तंत्रज्ञानाच्या मदतीने रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Zapatlela 3 movie update: मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांची दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे.

महेश कोठारे झपाटलेला ३ सिनेमाची निर्मिती करत आहेत आणि या सिनेमाच्या निमित्ताने सगळ्यांनाच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये झपाटलेला ३ सिनेमासाठी लक्ष्मीकांत यांचं AI व्हर्जन तयार करण्याची इच्छा व्यक्त केली.

नुकतीच महेश यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले,"लक्ष्या माझा जिवलग मित्र होता आणि अजूनही आहे. तो आजही माझ्याबरोबर आहे आणि तो मला मार्गदर्शन करतो असं मला वाटतं. मला लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर पुन्हा काम करायची इच्छा आहे. AI चा उपयोग करून मला लक्ष्मीकांत बेर्डेला पुन्हा क्रिएट करायचंय आणि ते मी करणारच. लक्ष्मीकांतला मी स्क्रीनवर आणणार आहे. महेश-लक्ष्या पुन्हा एकत्र दिसणार."

महेश यांच्या या वक्तव्यामुळे 'झपाटलेला ३' मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची झलक पाहायला मिळणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यावरही एका कार्यक्रमात महेश कोठारे यांनी उत्तर दिलं आहे.

'झपाटलेला ३' मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची झलक पाहायला मिळणार असून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्मीकांत यांची भूमिका रिक्रिएट करण्याचा प्रयत्न महेश यांची टीम करणार आहे. या निमित्तानं मराठी सिनेमात पहिल्यांदाच AIचा वापर करण्यात येणार असल्याचं कळतंय.

'झपाटलेला ३' मध्ये तात्या विंचूचंही दिसणार AI रूप

झपाटलेला ३ या आगामी सिनेमात तात्या विंचूचंही AI रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा आणखी सक्षम करण्याचे प्रयत्न सिनेमाची टीम करत आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने काही तांत्रिक गोष्टीसाठी आपण ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचं महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

हॉलिवूड सिनेमात झालाय AI चा प्रयोग

हॉलिवूडच्या गाजलेल्या 'फास्ट अँड फ्युरियस' सिनेमाच्या सातव्या भागात AI तंत्रज्ञानाचा वापर करत अभिनेता पॉल वॉकरला रिक्रिएट करण्यात आलं. या साठी पॉलच्या भावाने अभिनय केल्या होत्या आणि त्याच्या चेहऱ्यावर पॉलचे फोटो लावण्यात आले होते. 'फास्ट अँड फ्युरियस ७' रिलीज होण्यापूर्वी पॉलचा मृत्यू झाल्याने हा प्रयोग करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT