shivaji satam  esakal
Premier

Shivaji Satam: शिवाजी साटम यांच्या पत्नीच्या निधनानंतर मित्रासाठी खंबीर उभे राहिलेले मांजरेकर, घेतलेला मोठा निर्णय

Mahesh Manjrekar Shivaji Satam Friendship: लोकप्रिय अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मैत्री ४० वर्ष जुनी आहे. आता शिवाजी यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे.

Payal Naik

Shivaji Satam on Mahesh Manjrekar: मराठी सिनेसृष्टीत घट्ट मैत्रीची अनेक उदाहरणं सांगता येतील त्यातलंच एक उदाहरण म्हणजे अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची जोडी. मराठी सिनेसृष्टीतील या दोन दिग्गज कलाकारांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. महेश यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटात शिवाजी हे महत्वाच्या भूमिकेत दिसले. ते दोघे तब्बल ४० वर्षांपासून मित्र आहेत. मात्र त्यांच्या मैत्रीची खरी परीक्षा झाली ती शिवाजी यांच्या पत्नीच्या निधनावेळी. शिवाजी यांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा महेश यांनी त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.

मैत्रीदिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिवाजी यांनी ती आठवण सांगितली आहे. ते म्हणाले, 'गेल्या ४० वर्षांहून मी आणि महेश मित्र आहोत. त्याच्यासारखा मित्र मिळणं यासाठी नशीब लागतं. तो अजाणतेपणी अनेकांची काळजी घेत असतो. एरवी मितभाषी असलेला महेश मित्रांच्या मैफलीत मात्र खूप बोलतो, चर्चा करतो, किस्से सांगतो. मी त्याच्यासोबत बरीच कामं केली आहेत. माझ्या आठवणीत राहिलेला सिनेमा म्हणजे ‘कुरुक्षेत्र’. तेव्हाची आठवण म्हणजे त्या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात होत असताना माझ्या पत्नीचं निधन झालं. त्यावेळी मी तो चित्रपट करू शकणार नाही असं मला जाणवलं. तसं मी महेशला कळवलंसुद्धा होतं.'

पुढे शिवाजी साटम म्हणाले, 'माझ्या नकारावर तो म्हणाला, तू आता करू शकणार नाहीस ना, मग ठीक आहे. आपण दोन महिन्यांनी सिनेमाचं काम सुरू करू.’ खरंच त्यानं तसंच केलं. एखादा सिनेमा दोन महिने पुढे ढकलणं इतकं सोपं नसतं हे मी जाणून होतो; पण महेश त्यावर ठाम होता. त्यावेळी महेश माझा मित्र आहे याचा खूप अभिमान आणि समाधान वाटलं. एका मित्रासाठी एखादा हिंदी सिनेमा पुढे ढकलण्याचं धाडस महेशच करू शकतो. त्याने ते केलं. ते क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT