mahima chaudhari  esakal
Premier

Mahima Chaudhary: लोकप्रिय खेळाडूकडून फसवली गेलेली महिमा चौधरी; दुसरीसोबत रंगेहात पकडलेलं, आता म्हणते- तो जे वागला

Mahima Chaudhary Cheated In Love: लोकप्रिय खेळाडूने अभिनेत्री महिमा चौधरी हिची प्रेमात फसवणूक केली होती. आता तिने त्यावर भाष्य केलं आहे.

Payal Naik

लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी हिने 'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग होता. आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर ती सुरुवातीला बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक राहिली. अनेक निर्माते तिच्यासोबत काम करण्यासाठी ताटकळत उभे राहायचे. मात्र तिच्या अपघातानंतर सगळं काही बदललं. महिमाने तिच्या कारकिर्दीत एका खेळाडूला डेट केलं होतं.मात्र त्याने तिची खूप वाईट पद्धतीने फसवणूक केली. तिने त्याला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडलं होतं. आता दिलेल्या मुलाखतीत तिने त्यावर भाष्य केलं आहे.

तो माझ्याशी चांगला वागला नाही

महिमा आणि लोकप्रिय टेनिस खेळाडू लिअँडर पेस यांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केलं होतं. महिमा नेहमीच त्याच्यासाठी उभी राहिली. तिने प्रत्येकवेळी त्याला साथ दिली. जिथे जिथे त्याची मॅच असायची तिथे महिमा खेळ पाहायला जायची. मात्र फसवणूक झाल्यानं त्यांचं नातं संपुष्टात आलं. याचं कारण होतं मॉडेल रिया पिल्लई हीच्यासोबतचं अफेअर. महिमाने नुकतीच 'मिस मालिनी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत महिमा तिच्या पूर्वीच्या नात्याबद्दल म्हणाली, 'तो एक चांगला टेनिसपटू असू शकतो, पण तो माझ्याशी चांगला वागला नाही. त्याने माझ्यासोबत जे केलं ते खूप चुकीचं होतं.'

mahima chaudhary

महिमा पुढे म्हणाली, 'जेव्हा मला कळलं की तो दुसऱ्या एका स्त्रीसोबत फिरतोय तेव्हा मला धक्का बसला नाही. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी आणखी मजबूत झाले.' महिमाला वाटलं की पेसने रिया पिल्लईसोबतही असंच काही केलं होतं कारण पेसला रियाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.

न्यायालयाने पेसला दरमहिना १ लाख ५० हजार रुपये रियाला देण्याचे आदेश दिले होते. तर महिमाने 2006 मध्ये आर्किटेक्ट बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. नंतर 2011 मध्ये, हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा होत्या. या लग्नापासून महिमाला एरियाना नावाची 8 वर्षांची मुलगी आहे. तर कामाबद्दल सांगायचं तर महिमा लवकरच कंगना रणौत हिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT