Malaika Arora & Arjun Kapoor  Esakal
Premier

Malaika Arora & Arjun Kapoor : "ते अजूनही एकत्र"; ब्रेकअपच्या चर्चांवर मल्लिकाच्या मॅनेजरने केला खुलासा

Malaika Arjun Breakup Rumors : मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपबाबत तिच्या मॅनेजरने महत्त्वाचा खुलासा केला. काय म्हणाली तिची मॅनेजर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सगळीकडे आहेत. त्यातच पिंकव्हीला या वेबसाईटला मलायकाच्या जवळच्या व्यक्तीने त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याची बातमी दिली. पण ही बातमी खोटी असल्याचा खुलासा मलायकाच्या मॅनेजरने केला.

काय म्हणाली मलायकाची मॅनेजर?

मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाल्याची बातमी सगळीकडे पसरल्यावर मलायकाची मॅनेजरने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत या निव्वळ अफवा आहेत असं म्हंटलं. जेव्हा तिला त्यांच्या ब्रेकअप संबधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने "या निव्वळ अफवा आहेत" असं उत्तर दिलं.

काय घडलं नेमकं?

पिंकव्हिला या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, त्यांना मलायकाच्या जवळच्या व्यक्तीने अर्जुन आणि मलायकाचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. "मलायका आणि अर्जुन यांचं नातं खूप खास होतं आणि ते दोघंही एकमेकांच्या हृदयात विशेष स्थान कायम ठेवतील. त्यांनी वेगळं राहायचं ठरवलंय आणि या प्रकरणी त्यांनी मौन पाळलंय. ते कुणालाही त्यांच्या नात्यात ढवळाढवळ करू देणार नाही.

त्यांचं नातं खूप सुंदर होतं पण दुर्दैवाने ते आता वेगळे झाले आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यात काही वाद झाला आहे. ते एकमेकांचा प्रचंड आदर करतात आणि ते एकमेकांचे आधारस्तंभ आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांचं नातं खूप जपलं आहे. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तरीही ते एकमेकांना कायम आदर देत राहतील. ते दोघंही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि या भावनिक वेळी त्यांना त्यांचा वेळ मिळावा अशी त्यांची त्यांच्या चाहत्यांकडून अपेक्षा आहे." अशी मुलाखत सूत्रांनी दिली.

चाहते संभ्रमात

गेल्या पाच वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत त्यामुळे या बातम्यांमुळे त्यांचं खरंच ब्रेकअप झालंय कि मल्लिकाच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार असलेल्या अफवा आहेत यापैकी नक्की कशावर विश्वास ठेवावा याबाबत चाहते संभ्रमात आहेत.

पाच वर्षांचं डेटिंग आणि नात्याची कबुली

गेले पाच वर्षं अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावरही त्यांच्या नात्याची कबुली दिली होती पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळत होते. २०१८ ला मलायकाच्या ४५ व्या वाढदिवसादिवशी त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली. मलायका आणि अर्जुनच्या वयात बारा वर्षांचं अंतर होतं.

मलायकाने सलमानचा भाऊ अरबाज खानशी लग्न केलं होतं आणि त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे जो मलायकासोबत राहतो. अरबाजने देखील नुकतंच दुसरं लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT