man dhaga dhaga jodte nava serial  sakal
Premier

अरेच्चा! मालिकेने लीप घेतला अन् नायिकाच बदलली; 'मन धागा धागा जोडते नवा' मध्ये मोठा ट्विस्ट

Man Dhaga Dhaga Jodte Nava Serial Twist: लोकप्रिय मराठी मालिका 'मन धागा धागा जोडते नवा' मध्ये आता भलताच ट्विस्ट आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मन धागा धागा जोडते नवा'ने गेली कित्येक महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका टीआरपी यादीत टॉप १० मध्ये होती तर मालिकेची कथादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातील सार्थक आणि आनंदीची जोडीदेखील प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. त्यांचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. मात्र आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेने चक्क ६ वर्षांची लीप घेतली आहे. इतकंच नाही तर मालिकेची मुख्य नायिकाचं बदलण्यात आल्याचं चित्र दिसत आहे. या मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर चाहते नायिकेबद्दल विचारणा करताना दिसत आहेत.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो

'मन धागा धागा जोडते नवा' मध्ये सार्थकच्या वडिलांच्या मृत्यूसाठी आनंदीचा भाऊ जबाबदार असल्याचं समजत सार्थकची आई आनंदीला त्याच्या आयुष्यातून निघून जायला सांगते. ती आनंदीकडे घटस्फोट मागते. त्यानंतर थेट मालिकेत आता ६ वर्षानंतरची कथा दाखवण्यात आली आहे. यात सार्थक सहा वर्ष आनंदीच्या वतीने देवाला फुल वाहताना दिसतोय. तर फुल संपल्याने एक दुसरी व्यक्ती त्याला ते फुल देऊ करते. ही व्यक्ती म्हणजे अभिनेत्री मयुरी देशमुख. मयुरी मालिकेत सुखदा हे पात्र साकारत आहे. तिची आता मालिकेत नव्याने एंट्री झाली आहे. मात्र असं असेल तर आनंदी कुठे गेली असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसतायत.

man dhaga dhaga jodte nava new twist

नेटकऱ्यांचे प्रश्न

'आनंदी कुठे गेली?', 'आनंदीचा मृत्यू झाला का?' 'आनंदी सोडून गेली का?', 'सार्थक आणि आनंदीची जोडी छान होती, त्यांच्याशिवाय मालिकेला मजा नाही' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. मालिकेत सुखदाचं नेमकं पात्र काय, ती मालिकेत सकारात्मक पात्र साकारणार की आनंदी आणि सार्थक यांच्या मध्ये येणार, आनंदी नेमकी कुठे गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मालिकेच्या पुढील भागातच मिळतील. मात्र हा ट्विस्ट मालिकेच्या टीआरपीसाठी चांगला ठरणार की वाईट हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT