Man Dhaga Dhaga Jodte Nava esakal
Premier

Smita Tambe: मन धागा धागा जोडते नवा मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Man Dhaga Dhaga Jodte Nava: नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

priyanka kulkarni

Smita Tambe: छोट्या पडद्यावरील मन धागा धागा जोडते नवा (Man Dhaga Dhaga Jodte Nava) मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही दिवसांपूर्वीच दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली. सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी निष्णात वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे. नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) साकारणार आहे.

नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे. अतिशय हुशार, तल्लख आणि चालाख असलेली नेत्रा आजवर एकही केस हरलेली नाही. नेत्रा केस लढणार म्हण्टल्यावर विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीने थरकाप उडतो. त्यामुळे नेत्राच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे.

या केसमधून सार्थक निर्दोष सुटणार का? सार्थक-आनंदीच्या आयुष्यात कोणती नवी आव्हानं येणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. त्यासाठी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेचा आगामी एपिसोड तुम्हाला बघावा लागेल.

'मन धागा धागा जोडते नवा'ची स्टार कास्ट

अश्विनी मुकादम,दिव्या पुगावकर,स्नेहलता माघाडे आणि पुष्कर सरड हे कलाकार 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थाचा मोठा निर्णय; मंदिर २४ तास भक्तांसाठी खुलं राहणार!

SCROLL FOR NEXT