actor rohit kokate sakal
Premier

Rohit Kokate : मराठमोळ्या अभिनेत्याची ‘कान्स’वारी

रोहित कोकाटे अभिनित ‘द शेमलेस’ चित्रपटाची महोत्सवासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अभिनेते रोहित कोकाटे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द शेमलेस’ या चित्रपटाची प्रतिष्ठेच्या कान्स महोत्सवात निवड झाली आहे. मेमध्ये होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने हा मराठमोळा अभिनेता यंदा ‘कान्स’वारी करणार आहे.

चित्रपट विश्वात अतिशय नावाजलेल्या या कान्स महोत्सवातील ‘अन सर्टन रिगार्ड’ या स्पर्धात्मक विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. मुख्य स्पर्धेत निवड न झालेले, परंतु चाकोरीबाह्य अन् नवे प्रयोग असणाऱ्या चित्रपटांची निवड या विभागात केली जाते.

‘द शेमलेस’ हा हिंदी चित्रपट असून याची उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा यात मांडण्यात आली आहे. नादिरा आणि देविका या दोन मुलींचा अत्याचाराच्या तावडीतून सुटण्याची धडपड, हा या कथेचा गाभा आहे. बल्गेरियाचे कॉन्स्टॅन्टिन बोयानोव्ह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रोहित कोकाटे यांनी यात दिनेश नावाचे पात्र साकारले आहे. त्यांच्यासह या चित्रपटात मिता वसिष्ठ, किरण बी., अनसूया सेनगुप्ता, तन्मय धनानिया आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

रोहित कोकाटे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील पांगरी गावाचे. त्यांचे महाविद्यालयीन आणि अभिनयाचे शिक्षण पुण्यात झाले. प्रदीप वैद्य, योगेश सोमण, प्रा. वामन केंद्रे यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले. प्रायोगिक रंगभूमीवरून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईत विविध नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांकडे वळले.

‘कौल’ या मराठी चित्रपटातून रोहित यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांचे कौतुक झाले होते. त्यानंतर मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही त्यांनी काम केले. आजवर त्यांनी ‘बोगदा’, ‘कृपामंच’, ‘ढाई आखर’, ‘डेट विथ सई’, ‘रानबाजार’, ‘बंबई मेरी जान’, ‘जाऊ कहाँ बता ए दिल’ आदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

कान्स महोत्सवात आजवर मोजक्याच भारतीय चित्रपटांची निवड झाली आहे, त्या मांदियाळीत आपलाही चित्रपट आहे याचा अभिमान वाटतो. कान्स महोत्सवाबद्दल आजवर केवळ ऐकले होते, त्या महोत्सवात प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार आहे. माझा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय चित्रपट असून त्याची या प्रतिष्ठेच्या महोत्सवात निवड होण्याचा आनंद निराळाच आहे.

- रोहित कोकाटे, अभिनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT