girija oak  sakal
Premier

Anant Radhika Wedding: जरीची पैठणी अन् केसात गजरा! अमृता पाठोपाठ 'या' मराठी अभिनेत्रीची अंबानींच्या रिसेप्शनमध्ये दिमाखात एंट्री

Marathi Actress At Anant Ambani Wedding: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत आणखी एका अभिनेत्रीने अंबानींच्या लग्नात हजेरी लावली आहे.

Payal Naik

गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. गेले चार दिवस या लग्नाचे अनेक विधी पाहायला मिळत होते. मेहंदी, हळद, शिवशक्ती पूजा, गृहपूजा असे अनेक कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडले. १२ जुलै रोजी हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. ना भूतो ना भविष्यती असा हा सोहळा झाला. बॉलिवूड कलाकारांपासून ते दाक्षिणात्य कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच या सोहळ्याला उत्साहात हजेरी लावली. त्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र तिच्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जी मराठमोळ्या अंदाजात या लग्नाच्या रिसेप्शनला हजर झाली होती.

या लग्नासाठी हॉलिवूडच्या कलाकारांसह अनेक बड्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. बॉलिवूड कलाकार तर अनंतच्या वरातीत कल्ला करताना दिसले. या लग्नासाठी मराठी सिनेसृष्टीतून फार कमी कलाकारांना बोलवण्यात आलं होतं. त्यात अभिनेता श्रेयस राजे आणि अमृता खानविलकर हीचा समावेश होता. अमृताने गुलाबी शिमरी ड्रेसमध्ये या लग्नाला हजेरी लावली होती. तिच्या पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने अनंत आणि राधिका यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. ही अभिनेत्री आहे 'जवान' फेम गिरीजा ओक. गिरीजा अगदी मराठमोळ्या लूकमध्ये या कार्यक्रमासाठी पोहोचली होती.

तिने जांभळ्या रंगाची जरीकाठाची पैठणी नेसली होती. तर केसातील फूल आणि गजरा तिच्या लूकला आणखीनच खुलवत होते. तिच्या या लूकचं नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गिरिजाने मराठीसोबतच हिंदीमधील ‘द व्हॅसिन वॉर’, ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’, ‘लज्जा’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

Prithviraj Chavan on PM Modi : देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

जमलं तर थोडीशी जमीन घ्या... स्वतःच्या जमिनीवर डाळ तांदूळ पिकवून खातेय लोकप्रिय अभिनेत्री; म्हणते- इतका फरक...

Marathi News Live Updates : राहुल गांधींचा पोलीस ठाण्यात ठिय्या; जंतर-मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीवर एफआयआरची मागणी

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

SCROLL FOR NEXT