marathi entertainment news Prajakta Mali interview phullwanti Why did you choose Snehal Tarde as the director sakal
Premier

Prajakta Mali: दिग्दर्शक म्हणून स्नेहल तरडेची निवड का केली?

Latest phullwanti News: आपणच चित्रपटनिर्मिती करावी, असा विचार मनात आला आणि मग चित्रपट काढायचा ठरविले.

सकाळ वृत्तसेवा

Marathi News: पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली आहे, तसेच फुलवंती ही प्रमुख भूमिका तिनेच साकारली आहे. या चित्रपटाला आता चांगले यश मिळत आहे. त्यानिमित्त अभिनेत्री आणि निर्माती प्राजक्ता माळीबरोबर साधलेला संवाद...

वैभवी शिंदे

तू एक उत्तम अभिनेत्री आणि सूत्रसंचालक आहेस, पण चित्रपटनिर्मिती करण्याचा विचार तुझ्या मनात कसा आला?

- जेव्हा आपण एखाद्या चित्रपटात काम करत असतो, तेव्हा असे वाटते की कथा चांगली आहे, पण चांगली शूट केली नाही. कथा चांगली आहे, चांगली शूट केली गेली आहे, पण कलाकार चांगले नाहीत. बाकी सगळं चांगलं आहे, पण प्रमोशन नाही चांगलं केलं. चुकीच्या तारखेला रिलीज केली. या सगळ्याचा विचार केला, तर असे वाटत राहायचे की अजून चांगलं केलं गेलं असतं, तर या प्रोजेक्टने अजून चांगली कामगिरी केली असती. मग तेव्हाच असा विचार आला की आपण दुसऱ्यांना असे म्हणण्यापेक्षा आपणच मैदानात उतरावे. त्यामुळे आपणच चित्रपटनिर्मिती करावी, असा विचार मनात आला आणि मग चित्रपट काढायचा ठरविले.

‘फुलवंती’ हा चित्रपट ऐतिहासिक आहे. हा चित्रपट करताना अनेक अडथळे व आव्हाने आली असतीलच. त्यावर तू कशी मात केलीस?

- मी चित्रपटनिर्मिती करताना हा विचार केला होता की कथा फार भारी पाहिजे. मराठी प्रेक्षक अत्यंत हुशार आहेत. केवळ टाईमपास करणारे चित्रपट पाहायला मराठी रसिक जात नाहीत. मराठी चित्रपटाचा आशय आणि विषय निराळाच असला पाहिजे, तरच प्रेक्षक चित्रपट पाहतात. त्यामुळे मी एका कथेच्या शोधात होते व मला एकदम स्ट्राँग अशी कथा सापडली. ‘फुलवंती’ ही पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची कादंबरी माझ्या वाचनात आली आणि यावर चित्रपट काढायचा, असे मी ठरविले. मुळात माझे इतिहासावर खूप प्रेम आहे. मला जुना काळ प्रचंड आवडतो. मराठी संस्कृती, परंपरा, दाखवायला व पुढे न्यायला मी नेहमीच पुढाकार घेत आली आहे. यामुळेच फुलवंतीची निवड झाली, पण सगळ्यात मोठी अडचण आली होती ती म्हणजे पैशाची, पण पॅनोरमा स्टुडिओने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि टप्प्या-टप्प्याने सगळ्या गोष्टी होत गेल्या.

दिग्दर्शक म्हणून स्नेहल तरडेची निवड कशी काय केली?

- स्नेहल ताई खूप अभ्यासू आहे. तिचा वेदांचा खूप अभ्यास आहे. तिने संस्कृतमध्ये मोठी पदवी घेतलेली आहे. त्यामुळे अशा चित्रपटाच्या निर्मितीला मोठा अभ्यास लागतो. त्या काळचा अभ्यास लागतो. जो तिच्याकडे होता. तिचं वाचन खूप चांगलं आहे. शास्त्री बुवा कसे बोलतील, फुलवंती कशी बोलेल, तिची शब्दसंपदा कशी असेल, या सगळ्याचा तिचा अभ्यास दांडगा होता. एखाद्या स्त्रीभोवती सिनेमा फिरत असतो किंबहुना स्त्री केंद्रस्थानी असते, तेव्हा तिच्या मनात काय भावना असतात, हे स्त्री जास्त चांगलं ओळखू शकते. त्यामुळे तिची निवड ही योग्यच होती.

‘फुलवंती’ या चित्रपटाच्या बाबतीत तू काय सांगशील?

- आपला इतिहास खूप मोठा आहे आणि तो श्रीमंत आहे. आपल्या पूर्वर्जांनी फार मोठी कामगिरी करून ठेवलेली आहे. त्यांच्याकडून काही तरी घ्यायला मला आवडते आणि एक प्रेक्षक म्हणून मीसुद्धा ऐतिहासिक चित्रपटांना प्राधान्य देते. ऐतिहासिक गोष्टी ऐकायला मला खूप आवडतात. मी त्या काळामध्ये अधिक रमते. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट मी काढला आहे आणि असे चित्रपट रसिकांनी चित्रपटगृहामध्येच जाऊन पाहायला हवेत. आमचा हा बिग बजेट आणि बिग स्टार असलेला चित्रपट आहे. आता प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय याचा आनंद निश्चितच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Live Update: जोबिन जोसेफ यांची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नवी दिल्ली येथील कार्यालयात 'वैयक्तिक प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT