Zapatlela marathi movie esakal
Premier

Zapatlela : 'झपाटलेला ३' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

The first poster of 'Zapatlela 3' released, Know when will the movie release?

सकाळ वृत्तसेवा

Marathi Movie : झपाटलेला सिनेसीरिजमधील तिसरा चित्रपट येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे रंगली होती. महेश कोठारे यांनी राजश्री मराठी या चॅनेलला या संदर्भात मुलाखत दिली. त्यामुळे झपाटलेला सिनेमाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर 'झपाटलेला ३' या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. अभिनेता आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत झपाटलेला ३ सिनेमा येणार असल्याची बातमी स्पष्ट केली.

या सिनेमाच्या पोस्टरवर अर्धा चेहरा तात्या विंचूचा आणि अर्धा चेहरा आदित्यचा दिसून येतोय. त्यामुळे यावेळी तात्या आदित्यच्या शरीरात प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल का? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. पोस्टरवर 'मी तात्या विंचू...' असं कॅप्शन देण्यात आल्यामुळे यावेळी झपाटलेला ३मध्ये काहीतरी थरारक आणि तितकंच हटके कथानक पाहायला मिळणार असा अंदाज पोस्टरवरून येतोय. आदिनाथने या पोस्टरला "Yes it’s true !!! हो खरंय !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! २०२५ चित्रपटगृहात ! 2025 in the theatres ! ओम फट स्वाहा !!!" असं कॅप्शन दिल आहे.

त्याच्या या पोस्टरवर अनेकांनी कमेंट करत ते या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं म्हंटलं आहे. एका युजरने "2013 पासून वाट पाहतोय ... 12 वर्षानी परत येणार" अशी कमेंट केली आहे तर एकाने "मी जरूर पाहील हा चित्रपट. पण ह्या मधे दोन जनाची खुप आठवण येईल ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण." असं म्हणत या सिनेमातील दिवंगत कलाकार लक्ष्मीकांत आणि विजय चव्हाण यांची आठवण काढली. तर आदिनाथच्या सिनेविश्वातील मित्रांनीसुद्धा या पोस्टवर कमेंट करत त्याला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काहीच दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी ते लवकरच झपाटलेला ३ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची बातमी जाहीर केली होती. "झपाटलेला चित्रपटाच्या फ्रँचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत." असं ते या मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

झपाटलेला २ मध्ये तात्या विंचू पुन्हा बाहुल्याच्या रूपात जिवंत झाला होता आणि मानवी शरीर मिळवण्यासाठी तो लक्ष्याचा मुलगा आदित्यचा शोध घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या सिनेमात आदिनाथने आदित्यची भूमिका साकारली होती आणि आता पुन्हा तिसऱ्या भागातही आदिनाथ याच भूमिकेत दिसणार आहे. झपाटलेला २ मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा होती पण तिसऱ्या भागात ती काम करणार कि नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये. २०२५ या नवीन वर्षात झपाटलेला ३ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT