Rahul Vaidya Sakal
Premier

Rahul Vaidya : दुबईच्या पुरात अडकला मराठी गायक, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणाला....

दुबई शहराला १६ एप्रिलला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. दुबईत दोन वर्षात जितका पाऊस पडतो तितका एका दिवसात पडल्याने संपूर्ण दुबईचे रस्ते पाण्याखाली गेले.

सकाळ वृत्तसेवा

दुबई शहराला १६ एप्रिलला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. दुबईत दोन वर्षात जितका पाऊस पडतो तितका एका दिवसात पडल्याने संपूर्ण दुबईचे रस्ते पाण्याखाली गेले. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिक आणि पर्यटक यांनाही ठिकठिकाणी आश्रय घ्यावा लागला. बिग बॉस फेम गायक राहुल वैद्य हा देखील यावेळी दुबईत होता आणि अचानक आलेल्या या आपत्तीचा फटका त्यालाही बसला.

सोशल मीडियावर राहुलने त्याचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये तो पाणी भरलेल्या रस्त्यांवर हातात शूज घेऊन चालताना दिसतोय. या व्हिडिओला त्याने 'इथे खूपच वाईट परिस्थिती आहे...हबीबी दुबईमध्ये तुमचं स्वागत आहे' असं कॅप्शन दिलंय. राहुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

राहुलने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर दुबईतील रस्त्यांचे अनेक व्हिडीओज शेअर केले. या व्हिडिओमध्ये पुरामुळे दुबईच्या रस्त्यांवर साचलेलं पाणी, ट्राफिक, पाणी भरलेल्या रस्त्यातून वाट काढत जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत. फक्त दोन तास पाऊस पडल्यावर इकडची परिस्थिती पूर्णपणे बिघडल्याचे राहुलने या व्हिडिओमध्ये म्हंटल आहे. राहुल त्याच्या शोसाठी दुबईला गेला होता पण परत येताना अचानक आलेल्या पावसामुळे तो रस्त्यातच अडकला. राहुलच्या दुबईमध्ये राहणाऱ्या मित्रांनी त्याला मदत करत कसबसं एअरपोर्टवर पोहोचवलं आणि त्याने फ्लाईट पकडून कोलकता गाठलं.

दुबईमध्ये आलेल्या या अचानक आपत्तीमुळे विमानतळावर सुद्धा पाणी साचलं असून अनेक फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत त्यामुळे अनेक विमाने उशिराने धावत असल्याचं म्हंटल जातंय. तर दुबईआधील शाळा आणि ऑफिसेसना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान राहुल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी त्याने अभिनेत्री दिशा परमारशी लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच त्यांची लेक नव्याचा जन्म झाला. सोशल मीडियावर राहुल नव्याचे बरेच फोटोज शेअर करत असतो. त्याची बायको दिशाचा बडे अच्छे लगते है हा शो खुप गाजला होता. नकुल मेहतासोबतची तिची जोडी सगळ्यांनाच खूप पसंत पडली होती. तर आता दिशा पुन्हा टेलिव्हिजनवर कधी कमबॅक करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT