Matka King sakal
Premier

Matka King: नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'च्या शूटिंगला सुरुवात; सीरिजमध्ये झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Matka King: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी आता त्यांच्या मटका किंग या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

priyanka kulkarni

Nagraj Manjule: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशातच नागराज मंजुळे यांनी आता त्यांच्या मटका किंग (Matka King) या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याबाबत नागराज मंजुळेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा (Vijay Varma) महत्वाची भूमिका साकारणार आहे तर या वेब सीरिजमध्ये एक मराठमोळी अभिनेत्री देखील विशेष भूमिका साकाणार आहे.

सई ताम्हणकर झळकणार 'मटका किंग'मध्ये

2024 वर्ष हे सई ताम्हणकरसाठी (Sai Tamhankar) खरंच खास आहे आणि याच कारण देखील तितकच वेगळं आहे ! काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करत सईने तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती आणि काल अमेझॉन प्राईमने " मटका किंग " ची अधिकृत घोषणा करून सई देखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितलं आहे.

संपूर्ण जगाला " सैराट " करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजिते फिल्ममेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या " मटका किंग " मध्ये सई मुख्य भूमिकेत दिसणार आहे. केली होती. 2024 हे वर्ष सई साठी बॉलिवुडमय ठरतंय यात शंका नाही. एकामागोमाग एक असे दमदार प्रोजेक्ट्स ती करणार आहे. " भक्षक " या हिंदी वेब शो नंतर सई ने "अग्नी ", "ग्राउंड झिरो" आणि आता " मटका किंग " अश्या उत्कंठावर्धक बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये सई झळकणार आहे.

2024 मध्ये सई बॉलिवुड मध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. "मटका किंग" चं शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाल्याचं देखील या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. विजय वर्मा आणि अनेक बॉलिवुड कलाकारांची मांदियाळी असलेल्या या शो मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार आहे.

" मटका किंग " बद्दलची घोषणा सगळ्याच प्रेक्षकांसाठी उत्साही बातमी तर आहेच पण सई यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. सई आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे आणि म्हणून यातून काय सिनेमॅटिक अनुभव अनुभवायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

नागराज मंजुळे यांच्या सोबत काम करण्याबद्दल सई म्हणते "नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विश लिस्ट मध्ये देखील होती आता आम्ही मटका किंग सारख्या प्रोजेक्ट साठी सोबत काम करतोय आणि या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे. अनेक इंटरव्ह्यू आणि सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त देखील केली होती आणि स्वप्नपूर्ती होते म्हणून एक वेगळं सुख आहे हे ! अमेझॉन प्राईम साठी हि वेब सीरिज आम्ही करतो आहोत आणि विजय वर्मा देखील त्याचा एक भाग आहे विजय सोबत सुद्धा पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव या मुळे मिळणार आहे. तो एक उत्तम कलाकार आणि त्यांचा सोबत हा प्रोजेक्ट करतेय म्हणून मी खूप उत्सुक आहे. आता पुरत एवढंच सांगू शकते मटका किंग हा एक वेगळा अनुभव असणार आहे लवकरच या बद्दल अनेक गोष्टी तुम्हाला समजतील. नागराज मंजुळे, विजय वर्मा आणि मटका किंग साठी मला खूप उत्सुकता आहे हे वेगळं थ्रील असणार यात शंकाच नाही"

" ग्राउंड झिरो" " अग्नी " सारखे दोन उत्तम चित्रपट आणि आता " मटका किंग " वेब सीरिज या व्यतिरिक्त सई " डब्बा कार्टेल " वेब सीरिज मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर " डब्बा कार्टेल " रिलीज होणार असून यात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय. बॉलिवुडला सईच्या अभिनयाची भुरळ पडली आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi Rule: प्रो कबड्डीच्या रणभूमीत नवे तुफान! मोठे नियम बदलले, आता टायब्रेकरमुळे वाढणार थरार

Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी

Maharashtra Latest News Live Update : वडनेर दुमाला परिसरातला बिबट्या अखेर जेरबंद

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा चालवत असल्याच्या टिमक्या...; आनंद परांजपे यांची शिवसेनेवर जहरी टीका, काय म्हणाले?

"माझा घटस्फोट झालेला नाही" मराठी अभिनेत्रीने चर्चांवर मौन सोडत केली ट्रोलर्सची बोलती बंद; म्हणाली..

SCROLL FOR NEXT