Megha Dhade,Kangana Ranaut esakal
Premier

Kangana Ranaut: कंगना रनौतला भाजपचं तिकिट मिळताच मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली…

Kangana Ranaut: नुकतीच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं कंगनाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही हिमाचल (Himachal) प्रदेशातील मंडी येथून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. अशातच अनेकांनी कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर टीका केली तर काहींनी तिचे कौतुक देखील केले. आता नुकतीच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं कंगनाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

मेघा धाडेनं शेअर केली पोस्ट

अभिनेत्री मेघा धाडेनं (Megha Dhade) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कंगनाला तिच्या राजकारणातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मेघा धाडेनं कंगनाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "अभिनंदन, विजयी भव:"

Kangana Ranaut

मेघा धाडेनं भाजपमध्ये केला प्रवेश

मेघा धाडेनं काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत तिनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं, "आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश महामंत्री माननीय विजयजी चौधरी, माझी लाडकी सांस्कृतिक प्रकोष्ठची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा प्रियाताई बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले.मला प्रिया ताईनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार..."

कंगनाचे चित्रपट

कंगनाच्या इमर्जन्सी या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.या चित्रपटात कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती कंगनानेच केली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले. कंगनानं अजून इमर्जन्सी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT