mi honar superstar  sakal
Premier

Mi Honar Superstar Winner: सख्खे भाऊ ठरले 'मी होणार सुपरस्टार जोडी नं १'चे विजेते; बक्षीस म्हणून मिळाले 'इतके' लाख रुपये

Mi Honar Superstar Jodi No 1 WInner: ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे.

Payal Naik

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. अंतिम सोहळ्यात अनेक दमदार परफॉरमन्स सादर करण्यात आले. महाअंतिम सोहळ्यात ४ जोड्यांची एकमेकांशी लढत होती. या लढतीत कोथरूड पुणे येथील भावांच्या जोडीने बाजी मारली आहे. ते दोघे ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या सीझनचे विजेते ठरले आहेत. पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत पार पडली होती. त्यात आकाश व सुरज मोरे विजेते ठरले आहेत. त्यांना पाच लाखांचं बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे.

उपविजेते पदाचा मान सिद्धेश थोरात – रुचिता जामदार तसेच अपेक्षा लोंढे – प्रतिक्षा लोंढे या दोन जोड्यांना विभागून देण्यात आला. उपविजेत्या जोडीला दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. तर पूर्वा साळेकर व पलक मोरे या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना एक लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं आहे. विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना आकाश आणि सुरज म्हणाले, 'आम्ही आजवर बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला मात्र ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमाने विजेतेपदाचा आनंद मिळवून दिला. आम्हाला आमचं कौशल्य सिद्ध करण्यासाठी हक्काचा मंच दिल्याबद्द्ल स्टार प्रवाह वाहिनीचे खूप खूप आभार.'

आकाश आणि सुरज दोघेही सख्खे भाऊ आहेत. लहानपणापासूनच दोघांनाही नृत्याची आवड होती. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. मात्र, तरीही दोघांची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईने त्यांना नृत्याचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आज हे यश मिळवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT