Firoz Khan  Esakal
Premier

Amitabh Bachchan : बिग बींचे डुप्लिकेट फिरोझ यांचं निधन, कलाविश्वावर शोककळा

Firoz Khan : अमिताभ बच्चन यांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या फिरोझ यांचं काल निधन झालं.

सकाळ डिजिटल टीम

बिग बी अमिताभ बच्चन यांची हुबेहूब नक्कल करणारे अभिनेते फिरोझ खान यांचं काल २४ मे २०२४ मध्ये निधन झालं. उत्तर प्रदेशातील बदाउन इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हंटलं जात आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, एका शोसाठी फिरोझ हे बदायूंला गेले होते. ते त्यांच्या आगामी शोची तयारी करत होते. 4 मे रोजी बदायूं क्लब येथील मतदार महोत्सवात त्यांनी शेवटचा परफॉर्मन्स दिला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

अमिताभ यांच्या हुबेहूब नक्कलेमुळे मिळाली प्रसिद्धी

फिरोझ खान हे अमिताभ यांची हूबेहूब नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध होते. भाबी जी घर पर हैं या अँड टीव्ही वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेत त्यांनी अनेकदा अमिताभ यांच्या गेटअपमध्ये हजेरी लावली होती. त्यांचे यातील एपिसोड्स बरेच गाजले होते. याशिवाय त्यांनी सब टेलिव्हिजनवरील 'जिजा जी छत पर है' या कार्यक्रमातील भूमिकेनेही सगळ्यांची मनं जिंकली होती. साहिब बीवी और बॉस, हप्पू की उल्टान पलटन हा कार्यक्रमामध्येही त्यांनी काम केलं होतं.

या शिवाय फिरोझ यांनी अदनान सामीच्या 'थोडी सी तो लिफ्ट करा दे' या गाण्यात अमिताभ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

अमिताभ यांच्या भेटीचा क्षण

फिरोझ यांच्या आयुष्यात अमिताभ यांच्या भेटीचे अनेक क्षण आले. अनेकदा त्यांची भेट झाली होती. याशिवाय फिरोझ दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र, सनी देओल यांची सुद्धा नक्कल करायचे. ४ मेला त्यांनी शेअर केलेल्या शेवटच्या परफॉर्मन्समध्येही त्यांनी अमिताभ यांची मिमिक्री केली होती.

सोशल मीडियावरही सक्रिय

फिरोझ हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय होते. सोशल मीडियावर ते त्यांचे बरेच व्हिडीओज शेअर करायचे. सोशल मीडियावर त्यांचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स होते. दीपिका कक्करपासून अनेक कलाकार त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. त्याच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

SCROLL FOR NEXT