Mirzapur Season 3 SAKAL
Premier

Mirzapur 3 Trailer: "कालीन भैय्या गॉन, गुड्डू पंडित ऑन!"; 'मिर्जापुर-3' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Mirzapur 3 Trailer: मिर्झापूर-3 (Mirzapur-3) या वेब सीरिजची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकतेने वाट बघत आहेत.

priyanka kulkarni

Pankaj Tripathi Web Series: ओटीटीवरील मिर्झापूर (Mirzapur) या वेब सीरिजच्या दोन सीझन्सला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. आता या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिर्झापूर-3 (Mirzapur-3) या वेब सीरिजची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता मिर्झापूर-3 या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये काही अॅक्शन आणि इमोशनल सीन्स दिसत आहेत.

'मिर्झापूर- 3'चा धमाकेदार ट्रेलर

'मिर्झापूर- 3' या वेब सीरिजचा ट्रेलरमध्ये गुन्हेगारी,सत्तेसाठी लढाई अन् छल-कपट बघायला मिळत आहे. मिर्झापूरवर राज्य करण्यासाठी होणारी गुन्हेगारी, ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. 'मिर्झापूर- 3'या सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात गुड्डू पंडितच्या "कालीन भैय्या गॉन, गुड्डू पंडित ऑन!" या डायलॉगनं होते. त्यानंतर मिर्झापूर वेब सीरिजच्या इतर पत्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये बघायला मिळते.

मिर्झापूरवर गुड्डू पंडित राज्य करणार की कालीन भैय्या पुन्हा धमाकेदार एन्ट्री करुन मिर्झापूरची सत्ता काबीज करणार? हे आता मिर्झापूर या वेब सीरिजचा तिसरा सीझन पाहिल्यानंतर प्रेक्षकांना समजणार आहे.

'ये गद्दी ये परंपरा... बाउजी और हमने बनाई थी। अब वो करवाएंगे तो पूर्वांचल के इतिहास में आज तक नहीं हुआ।', या मिर्झापूर-3 या वेब सीरिजच्या ट्रेलरमधील कालीन भैय्याच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पाहा ट्रेलर

'मिर्झापूर- 3' कधी होणार रिलीज?

पंकज त्रिपाठी, अली फज़ल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पेन्यूली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, मेघना मलिक आणि मनु ऋषी चड्ढा हे कलाकार 'मिर्झापूर- 3' या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 जुलै 2024 रोजी रिलीज होणार आहे. 'मिर्झापूर- 3' या वेब सीरिजचे दहा एपिसोड्स असणार आहेत, असं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT