Mr and Mrs Mahi Trailer Out sakal
Premier

Mr and Mrs Mahi Trailer Out: क्रिकेटप्रेमी जोडप्याची हटके लव्ह स्टोरी; 'मिस्टर अँड मिसेस माही'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Mr and Mrs Mahi Trailer Out: 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Mr and Mrs Mahi Trailer Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हे दोघे सध्या त्यांच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr and Mrs Mahi) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचा 2 मिनिट 55 सेकंदाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, जान्हवी आणि राजकुमार या दोघांचेही नाव माही असते. या 'मिस्टर अँड मिसेस माही' या जोडप्याची लव्ह स्टोरी ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. मिस्टर अँड मिसेस माही यांना क्रिकेटची आवड असते. अशातच हे दोघे कसे त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा पूर्ण करतात हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

पाहा ट्रेलर:

राजकुमार आणि जान्हवी शेअर करणार स्क्रिन

'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट नक्कीच कमालीचा असणार आहे, असं ट्रेलर मधून बघायला मिळतंय. सर्वात पॉवरपॅक परफॉर्मर राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. दोघांनी यापूर्वी 'रुही' या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

कधी रिलीज होणार 'मिस्टर अँड मिसेस माफी' चित्रपट?

शरण शर्मा दिग्दर्शित मिस्टर अँड मिसेस माही 31 मे रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय राजकुमार हा 'स्त्री 2' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT