Mrunmayee Deshpande esakal
Premier

Mrunmayee Deshpande: घरासमोर गुढी, मातीची चूल आणि शेणाने सारवलेली जमीन, मृण्मयी-स्वप्नीलनं शेतात बांधलं घर, पाहा व्हिडीओ

मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नील शेतीसुद्धा करत असून त्यांनी महाबळेश्वरजवळ जमीन घेतलीये. तिथे ती विविध पिकांची लागवड करतात आणि या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा ते देतात.

priyanka kulkarni

Mrunmayee Deshpande: अभिनेत्री, नृत्यांगना आणि सूत्रसंचालिका म्हणून अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने (Mrunmayee Deshpande) स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. यासोबतच मृण्मयी ओळखली जाते ती तिच्या अॅक्टिव्हिटीजमुळे. मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नील शेतीसुद्धा करत असून त्यांनी महाबळेश्वरजवळ जमीन घेतलीये. तिथे ती विविध पिकांची लागवड करतात आणि या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा ते देतात.

नुकतंच मृण्मयी आणि स्वप्नीलने त्यांच्या स्वतःच्या शेतात मातीचं घर बांधलं. होळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी या घराचं काम सुरु केलं आणि नुकताच त्यांनी या घरात गृहप्रवेश केला. हे घर त्या दोघांनी स्वतः बांधलं आहे. त्यांनी त्यांच्या या नव्या घरासमोर गुढी उभी करत तिची पूजा केली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. मृण्मयीने या व्हिडिओला "शेतावरती काहीतरी नवं…हातानी बांधलेलं…प्रेमानी बांधलेलं…" असं कॅप्शन मृण्मयीने या व्हिडिओला दिलं आहे.

पहा व्हिडीओ:

मातीने सारवलेल्या कुडाच्या भिंती, कौलारु छप्पर, चूल असलेल्या या मृण्मयी -स्वप्निलच्या छोट्याशा घराचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. एका युजरने."खूप सुंदर माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग आला तुमचं घर बघून. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताई बाहेर उभी आणि आतमध्ये ज्ञानेश्वर माऊली" अशी कमेंट केलीये. तर एकाने "तुम्ही माझं स्वप्नं जगता आहात." अशी कमेंट केली आहे.

काही दिवसांपूर्वी मृण्मयी आणि स्वप्नीलने सोशल मीडियावर होळीच्या शुभ मुहूर्तावर शेतात मातीचं घर बांधत असल्याची बातमी शेअर केली होती. सगळ्यांनी एकत्र येत या घराचं बांधकाम सुरु केलं होतं.

पहा व्हिडीओ:

गेल्या काही वर्षांपासून मृण्मयी आणि स्वप्नीलने मुंबईतील त्यांचं राहत घर सोडून महाबळेश्वरला शेतावर राहण्यास सुरुवात केली. इथे त्यांनी त्यांचा पारंपरिक शेतीचा व्यवसायसुद्धा सुरु केला असून 'नील अँड मोमो' ब्रँड अंतर्गतते ऑरगॅनिक वस्तूसुद्धा विकतात.

मृण्मयीचा आता स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. १ मे २०२४ ला हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुनील बर्वे, सुखदा खांडकेकर, आदिश वैद्य, सागर तळाशीकर, अपूर्वा मोडक यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर या सिनेमाचं दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT