Premachi Goshta Twist Esakal
Premier

Premachi Goshta : आदित्यमुळे होणार मुक्ताला अटक ; मालिकेत आला नवा ट्विस्ट

Premachi Goshta New Twist : स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Star Pravah : मराठी मालिकांमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका गाजतेय. या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे. सावनीच्या हळदी समारंभावेळी आदित्यने केलेल्या तक्रारीमुळे मुक्ताला पोलीस अटक करणार आहेत.

मालिकेचा प्रोमो

नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं कि, आदित्य स्वतःचा हात उकळत्या पाण्यात टाकतो. त्यानंतर सावनीच्या हळदीला मुक्ता तिला हळद लावत असताना पोलीस येतात आणि मुक्ताला सावत्र मुलाचा छळ केल्याबद्दल अटक करायला आल्याचं सांगतात. तेव्हा सागर मुक्ताची बाजू घेऊन पोलिसांचा काहीतरी गैरसमज झाल्याचं सांगतो. तो आदित्यला बोलावतो तेव्हा त्याचा हात भाजला असल्याचं सागरला दिसतं आणि त्या दोघांनाही धक्का बसतो.

मुक्ता स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करू शकेल का ? सागर मुक्तावर विश्वास ठेवणार का ? आदित्यचा खोटेपणा उघडकीस येणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या आगामी भागात मिळतील. मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी मात्र संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजणांनी असे एपिसोडस दाखवू नका यातून मुलं चुकीच्या गोष्टी शिकतील असं म्हंटलं आहे तर काहींनी मुलांना असं काही करू नये याची शिकवण द्या असा सल्ला दिला आहे.

मालिकेचा हा नवीन भाग १६ जुलैला रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ये है मोहोब्बत्ते या मालिकेवर ही नवीन मालिका आधारित असून तेजश्री आणि राजची जोडी सगळ्यांना पसंत पडली आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका आघाडीवर आहे. अग्गबाई सासूबाई ही मालिका गाजल्यानंतर तेजश्रीने बऱ्याच काळानंतर मालिकाविश्वात कमबॅक केलं असून तिची आणि शुभांगी गोखले यांची ऑनस्क्रीन आई-मुलीची केमिस्ट्री अनेकांना आवडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT