Munjya Esakal
Premier

Munjya : तब्बल ६० कॅमेरे, मो- कॅप अ‍ॅक्टर आणि... असा तयार झाला पडद्यावरील 'मुंज्या'; दिग्दर्शकाने केला खुलासा

Munjya Director's Reveal Character secret : मुंज्या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी मुंज्या हे पात्र कसं बनवलं हे सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

Munjya Movie : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. या सिनेमाने आतापर्यंत 108 करोड रुपयांची कमाई केली आहे. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि त्यांच्याबरोबरच मुंज्या हे व्हीएफएक्स पात्रही सोशल मीडिया गाजवतंय. हे पात्र कसं बनवलं याची गोष्ट आदित्य यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलंय.

६० कॅमेरे आणि मोशन कॅपने केलेलं चित्रण

रेडीफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य यांना मुंज्या हे सीजीआय पात्र असून ते कसं बनवलं आणि त्याच्या निर्मितीवेळी काय आव्हानं आली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य यांनी उत्तर दिलं कि,"द सीजीआय खूप चॅलेंजिंग होतं कारण या आधी इंडस्ट्रीत असं पात्र कधी निर्माण केलं गेलं नव्हतं. माझ्याकडे त्यासाठी कोणतंच उदाहरण नव्हतं.

आर आर आर सिनेमात अनेक प्राणी आणि पात्रं बनवण्यात आली होती तसंच रोबोट सिनेमासाठीही काही गोष्टी तयार करण्यात आला होत्या. पण बऱ्याच सिनेमांमध्ये असं उदाहरण नाहीये जे बोलतं. भावना व्यक्त करते आणि सिनेमात अभिनय करतं. मुंज्या हे सगळं करतो आणि तो खरंच परफॉर्म करतो.

त्यासाठी आम्हाला बेस्ट व्हीएफएक्स टीम हवी होती आणि त्यासाठी आम्ही डीएनईजी (डबल निगेटिव्ह, द ब्रिटिश व्हीएफएक्स स्टुडिओ). त्यांनी ड्यून पासून मार्व्हल यांसारख्या अनेक सिनेमांसाठी काम केलं आहे.

मी खूप तांत्रिकदृष्ट्या गोष्टी सांगणार नाही पण एक खूप बेसिक गोष्ट असते ज्याला मोशन कॅप्चर म्हणतात आणि तिथे फट कलाकार परफॉर्म करू शकतो. तो अभिनेता मो कॅप सूट घालून स्टुडिओमध्ये परफॉर्म करायचा आणि त्याला ६० हुन जास्त जास्त वेगवेगळे कॅमेरे शूट करायचे. त्यानंतर त्याच्या हालचालही मुंज्याच्या मॉडेलवर पुन्हा बनवल्या जायच्या ज्या आपण आता सिनेमात पाहतो आहोत.

ही जवळपास वर्षभर सुरु असलेली पोस्ट प्रॉडक्शन प्रक्रिया होती आणि आम्हाला उत्तम पात्र मिळण्यासाठी या प्रक्रियेतून जावं लागलं. "

मुंज्याची कथा

या सिनेमाची कथा कोकणातील लोककथेवर बेतली असून एका घरातील मुलाला मुंज्या नावाचं भूत झपाटतं कारण त्या मुंज्याला त्याला आवडणाऱ्या मुन्नी नावाच्या मुलीशी लग्न करायचं असतं. पुढे काय होतं याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT