Munjya Review sakal
Premier

Munjya Review: हाॅरर-काॅमेडीची उत्तम गुंफण असलेला मुंज्या

Munjya: थरारक आणि भीतिदायक असा मुंज्या हा हाॅरर चित्रपट आहे.

Santosh Bhingarde

Munjya Review: उलाढाल या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या आदित्य सरपोतदारने आतापर्यंत उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. नारबाची वाडी, झोंबिवली अशा त्याच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो हिंदीकडे वळलेला आहे. दिनेश विजन आणि अमर कौशिक यांच्या मुंज्या या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा आहे कोकणातील एका दंतकथेवर बेतलेली आहे. येथील चेटूकवाडी या छोट्याशा गावातून कथेला सुरुवात होते. गोट्या नावाचा दहा वर्षांचा मुलगा आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या मुन्नीच्या प्रेमात पडतो. त्याला तिच्याशी लग्न करायचे असते. पण ही बाब जेव्हा गोट्याला आईला समजते तेव्हा ती त्याला छडीने मारहाण करते आणि त्याची मुंज करून टाकते. त्यानंतर आपले प्रेम मिळविण्यासाठी गोट्या आपल्याा बहिणीला घेऊन चेटूकवाडीतीलच एका झाडाखाली जातो. तेथे तंत्रमंत्राच्या साह्याने आपल्या बहिणीचा बळी देऊन मुन्नीला प्राप्त करण्याचा त्याचा विचार असतो. परंतु तेथे त्याची बहीण आणि त्याच्यामध्ये झटापट होते. त्यामध्ये गोट्याचा मृत्यू होतो. मग त्याचा अस्वस्थ आत्मा भूत बनून त्या झाडावर राहते. काही वर्षानंतर त्याचा वंशज बिट्टू (अभय वर्मा), त्याची आई (मोना सिंह) आणि आजी (सुहास जोशी) त्याच गावात येतात. मग बिट्टूला मुंजा नावाचे भूत घाबरवीत असते. कारण या मुंजाला बिट्टूला घाबरवून आणि त्याला त्रास देऊन मुन्नीला शोधायचे असते. कारण मुन्नीशी लग्न करायचे असते आणि आपला अतृप्त आत्मा पूर्ण करायचा असतो. मग मुंजाची नजर बिट्टूची मैत्रीण बेला (शर्वरी वाघ) हिच्यावर पडते. मग बेलाचे काय होते...बिट्टू मुन्नीला शोधतो का....मुंजा पुढे बिट्टूला कसा त्रास देतो..त्याने बिट्टू काय निर्णय घेतो...या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पाहाला लागेल. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने हाॅररबरोबरच काॅमेडीचा उत्तम तडका या कथेला दिला आहे.

विशेष बाब म्हणजे सीजीआय म्हणजेच संगणकाद्वारे तयार केलेली मुंजाची प्रतिमा चित्रपटातील मुख्य पात्र आहे. ग्राफिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲनिमेशनच्या साह्याने तयार करण्यात आलेले हे पात्र पहिल्यापासूनच पाहताना आपल्या मनात भीती निर्माण करते. त्यानंतर कथानक जसजसे पुढे सरकत जाते तसतशी आपल्या मनातील ही भीती

कमालीची वाढत जाते आणि पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली जाते. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने या कथेची बांधणी उत्तम केली आहे. थरारक आणि भीतिदायक असा हा हाॅरर चित्रपट आहे. अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंह, सत्यराज, सुहास जोशी. अजय पूरकर, रसिका वेंगुर्लेकर, तरणज्योत सिंह, भाग्यश्री लिमये अशा सगळ्याच कलाकारांनी अभिनयाची बाजू उत्तम सांभाळली आहे. शर्वरी वाघने बेला ही व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. ती पडद्यावर सुंदर दिसतेच शिवाय अभिनय आणि नृत्यदेखील छान करते. त्यावरून ती हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी झेप घेईल असे दिसते आहे. अभय वर्माने बिट्टूच्या भूमिकेचे बेअरिंग उत्तम पकडलेले आहे.

बिट्टूच्या भूमिकेतील विविध हावभाव आणि त्याचा भूमिकेतील निरागता त्याने पडद्यावर सुरेख मांडली आहे. सिनेमॅटोग्राफर सौरभ गोस्वामी यांनी समुद्र आणि जंगलातील दृश्यांमध्ये आपली कलात्मकता छान दर्शविली आहे. हा हाॅरर चित्रपट आहे. त्यामुळे त्याचे पार्श्वसंगीत दमदार असणार यामध्ये काही शंका नाही. या चित्रपटाच्या बाबतीत असेच आहे. पार्श्वसंगीत या चित्रपटाचे दमदार झाले आहे. त्यामुळे चित्रपटाने चांगली पकड घेतली आहे. काही बाबी या चित्रपटाच्या खटकणाऱ्या आहेत. काही ठिकाणी मेकअप भडक झाला आहे. तसेच सुरुवातीपासून चित्रपट चांगली पकड घेतो परंतु काही ठिकाणी दिग्दर्शकाची पटकथेवरील पकड निसटते की काय अशी शंका मनात येते. परंतु त्याच वेळी तो सावरतो आणि कथानक वेगाने पुढे सरकते. मुंजाची ही एक कथा कोकणातील एक दंतकथा आहे आणि या कथेमध्ये अनेक वळणे आहेत. त्यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो.

चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचे झाले तर शर्वरी वाघचे 'तरस' हे आयटम साँग देखणे झाले आहे. याचे संगीतकार सचिन- जिगर हे आहेत. महत्त्वाचे म्हणजे क्लायमॅक्समध्ये या हॉरर-कॉमेडीच्या सिक्वेल येणार असा संकेत देण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रुही, स्त्री, भेडिया असे काही हाॅरर-काॅमेडी चित्रपट आले आहेत आणि त्याला चांगला दाद रसिकांनी दिली आहे. हा चित्रपटदेखील हाॅरर-काॅमेडीची उत्तम गुंफण असलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT