Munjya Trailer sakal
Premier

Munjya Trailer: "मुन्नी के लिए मुंज्या जान दे भी सकता है और ले भी सकता है"; मुंज्याचा थरारक ट्रेलर रिलीज

Sharvari Wagh: आता 'मुंज्या' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Horror Comedy: हॉरर कॉमेडी चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशातच आता नुकतीच एका हॉरर चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव 'मुंज्या' (Munjya) असं आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

स्त्री या हॉरर कॉमेडी चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या दिनेश विजान यांचा मुंज्या हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्त्री'च्या यशानंतर जवळपास सहा वर्षांनी ते आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

मुंज्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक जंगल दिसते, या जंगलामध्ये एक शापित ठिकाण. या ठिकाणी एक झाडही असते,जिथे मुंज्याची आत्मा असते. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, मुंज्याचे लग्न मुन्नीशी होणार असते, पण त्या आधीच त्याचा मृत्यू होतो. त्या दिवसापासून, मुंज्या भूत होऊन मुन्नीची वाट बघत असतो.

पाहा ट्रेलर

शर्वरी वाघनं मुंज्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं, "मुन्नी के लिए मुंज्या जान दे भी सकता है और ले भी सकता है, आ गया है मुंज्या"

शर्वरी वाघनं तिच्या करिअरची सुरुवात असिस्टेंट डायरेक्टर म्हणून केली. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. शर्वरीनं बंटी और बबली 2 मध्ये काम केलं आहे.

'मुंज्या'ची स्टार कास्ट

मुंज्या या चित्रपटात शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा, सुहास जोशी आणि सत्यराज सिंग या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. मुंज्या 7 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सतपोतदारनं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT