Naga Chaitanya New Porsche Car: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा सध्या त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यनं नुकतीच नवीकोरी पोर्शे कार (Porsche Car) खरेदी केली आहे. त्याच्या या नव्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नागा चैतन्यच्या या नव्या कारची किंमत किती आहे? जाणून घेऊयात...
नागा चैतन्यनं सिल्व्हर कलरची पोर्श 911 GT3 ही गाडी खरेदी केली आहे. त्याच्या या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिपोर्टनुसार, Porsche 911 GT3 RS ची भारतात एक्स-शोरूम किंमत 3.51 कोटी रुपये आहे.
चेन्नईच्या गाडीच्या शोरुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नागा चैतन्यच्या नव्या कारचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, "अक्किनेनी नागा चैतन्य यांचे पोर्शे कुटुंबात आम्ही स्वागत करतो. त्यांना त्यांची 911 GT3 RS ही गाडी देताना आम्हाला आनंद होत आहे."
एका रिपोर्टनुसार, या कारचे रजिस्ट्रेशन 17 मे 2024 रोजी करण्यात आले. नागा चैतन्यची ही कार हैदराबादची पहिली Porsche 911 GT3RS असल्याचेही सांगितले जात आहे.
नागा चैतन्यला लक्झरी कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन आहे. BMW 740 Li, Ferrari 488GTB, Nissan GT-R ,Mercedes Benz G-Class G 63 AMG, 2X Land Rover Range Rover Vogue या गाड्या देखील नागा चैतन्यकडे आहेत. आता त्याच्या कार कलेक्शनमध्ये पोर्शे गाडीचा समावेश झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.