Nagarjuna apologises after viral video shows bodyguard pushing a specially-abled fan 
Premier

Viral Video: नागार्जून तुझं चुकलं.. ! चाहत्याला बॉडीगार्डने ढकलले अन् अभिनेत्याला मागावी लागली माफी, काय घडलं नेमकं ?

Nagarjuna Viral Video: तेलुगू सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनने त्याच्या चाहत्याची माफी मागितली.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करताना दिसतात. अनेक वेळा आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटल्यावर चाहते खूप इमोशनल होतात. यावेळी चाहत्यांना अनेक वाईट अनुभव येत असतात. याचाच प्रत्यय मुंबई एअर पोर्टवर आला. या प्रकरणी तेलुगू सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनने चाहत्याची ट्विट करत माफी मागितली आहे. (Nagarjuna Viral Video)

मुंबई एअरपोर्टवर काल नागार्जुनच्या चाहत्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे सोशल मीडियावर नागार्जुनला ट्रोल करण्यात येत आहे. 'जेवढा मोठा आहे, तितका नम्र असावा, पण इथे अहंकार क्लाउड नाइनवर आहे.' अशा अनेक कमेंट्सद्वारे नागार्जुनवर टीका करण्यात येत आहे.

नेमकं घडलं काय?

व्हायर होणाऱ्या व्हिडिओमध्ये नागार्जुन आणि अभिनेता धनुष दोघेही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. दोघे एअरपोर्टवरुन बाहेर पडत होते. अशातच नागार्जुनचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी पुढे आला. त्याने अभिनेत्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच त्याच्या बॉडिगार्डने त्याला ढकलं. बॉडिगार्डच्या या कृतीमुळं चाहत्याला तोल गेला. हा चाहता दिव्यांग होता.

नागार्जुनला मात्र या घटनेची कल्पना नव्हती. धनुषला मात्र ही गोष्ट लक्षात आल्याने त्याने मागे वळून पाहिलं. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच नागार्जुनला ट्रोल करण्यात आले. दरम्यान या घटनेची दखल घेत नागार्जुनने जाहिर माफी मागितली आहे.

मी त्या गृहस्थाची माफी मागतो...

'हे नुकतेच माझ्या लक्षात आले आहे. असं व्हायला नको होतं!! मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असे होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे वचन देतो. अशा आशयाची पोस्ट करत नागार्जुनने ट्विट करत चाहत्याची माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT