atul parchure nana patekar esakal
Premier

अतुल परचुरे यांच्या आजारपणात नाना पाटेकरांनी केलेला सोनियाला फोन; मित्रासाठी केलेली खास गोष्ट, म्हणालेले- काहीही...

Nana Patekar Completed Atul Parchure's Wish: लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांनी यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांचे काही किस्से आता व्हायरल होत आहेत.

Payal Naik

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं आज 14 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. त्यांना कर्करोग झाला होता. त्यावर ते उपचार घेत होते. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि या आजारामुळे त्यांचं निधन झालं. गेले २ वर्ष अतुल या रोगाशी झुंज देत होते. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानंतर त्यांना या रोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांचा कर्करोगाविरुद्ध लढा सुरू झाला होता. मात्र जेव्हा ते आजारपणातून थोडे बरे झाले होते तेव्हा अभिनेते नाना पाटेकरांनी त्यांना फोन केला होता आणि आपल्या मित्रासाठी त्यांनी एक खास गोष्ट केली होती. त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांनी ही गोष्ट केली.

अतुल यांनी काही महिन्यांपूर्वी सौमित्र पोटे यांच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यात बोलताना ते म्हणाले, 'नाना पाटेकराचा फोन आला सोनियाचा की काय लागेल ते सांगायचं. कधीही, कितीही, काहीही. तर नानांना सोनिया म्हणाली, काही लागलं तर सांगू पण आता ठीक आहे सगळं. तर त्यांना ते काहीतरी अतुलसाठी करावं हे मनात होतं. त्यांनी काय करावं. त्यांनी आयपीएलला मला फोन केला. मी तुला घ्यायला येतोय. आपण सुनील गावस्कर एनक्लोजरमध्ये जाऊन मॅच बघायचीये. तुला क्रिकेट आवडतं ना. वानखेडे स्टेडियमला गावस्कर एनक्लोजरमध्ये गावस्करांचा जो बॉक्स आहे तिथे बसून त्यांनी मला मॅच दाखवली.'

अतुल पुढे म्हणाले, 'त्यांनी मला गावस्करांची ओळख करून दिली. याला बरं नाहीये पण तुझ्या स्टॅन्डला मी त्याला घेऊन आलो. त्याला मॅच बघायचीये. आम्ही मॅच बघितली आणि परत घरी आणून सोडलं.' हीच गोष्ट शिरीष जोशीने केलेली. त्याने अनिल कुंबळेसोबत मला डिनरला नेलं होतं. तो त्याचा जवळचा मित्र आहे. काय करू शकतो आपण मित्रासाठी. यांनी हे केलं.' अतुल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. मात्र आता त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Trending : सुप्रीम कोर्टाचा कडक निर्णय! कोर्टाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास होणार कारवाई, कोणती शिक्षा होऊ शकते? पाहा

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

SCROLL FOR NEXT