nana patekar on balasaheb thackeray  sakal
Premier

Nana Patekar: बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला मढमधील प्लॉट घेण्यास नाना पाटेकरांनी दिलेला नकार; कारण सांगत म्हणाले-

Nana Patekar On Balasaheb Thackeray: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी मुलाखतीत त्यांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

Payal Naik

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर तर भाष्य केलंच सोबतच वेगवेगळ्या विषयावर आपली मतं देखील मांडली. त्यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांना भेटल्याचा प्रसंग सांगितला. सोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आपल्या आठवणीही सांगितल्या. बाळासाहेबांचा आपल्यावर खूप जीव होता असं ते म्हणाले.

सुशांतच्या घरी गेल्यावर काय घडलं असं विचारताच ते म्हणाले, 'काहीच नाही घडलं. मी बोलूच नाही शकलो. मी फक्त त्याच्या वडिलांचा हात हातात घेऊन बसलो होतो. काय बोलणार? माझ्या घराचा मुलगा गेला असता तर? काय सुचलं असतं बोलायला.' पुढे बाळासाहेबांसोबतचं नातं सांगत नाना म्हणाले, 'मी खूपदा त्यांना भेटायला जायचो. खूपदा म्हणजे खूपदा. त्यांचं प्रचंड प्रेम होतं माझ्यावर. त्यांच्या मुलाप्रमाणे प्रेम करायचे ते माझ्यावर. त्यांच्यासोबत बसून खूप गप्पा मारल्यात. त्यांच्यासोबतचं नातंच काही वेगळं होतं. शेवट्पर्यंत मी त्यांच्याशी जोडलेलो होतो.'

पुढे नाना म्हणाले, ' शेवटच्या दिवसांमध्येही मी त्यांच्यासोबत होतो. आमचे एक डॉक्टर होते ते त्यांना ट्रीट करत होते. खूप चांगलं नातं होतं. मी याआधी कधी बोललो नाही आणि आता बोलणं योग्यही नाही. काही फोटो आहेत जे बघितलेत तर तुमचा विश्वास बसणार नाही. माझ्या घरी आहेत ते फोटो. त्यांनी स्वतः हा अल्बम पाठवलेला माझ्याकडे. मी त्यांच्याकडे गेलेलो तेव्हा त्यांच्या फोटोग्राफरने काढलेले फोटो आहेत. एक एक फोटो बघून तुम्ही चकीत व्हाल. त्यांचा एक फोटो मी घरात लावलेला. त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, आदर दिला मला. मुंबईमध्ये ते मला एक मोठा प्लॉट देत होते तो ही मढमध्ये. हा तू घे असं म्हणालेले. मी म्हणालो नको. मला नकोय. माझ्याकडे घर आहे आणि माझ्या प्रेमाच्या व्याख्येत हे बसत नाही.' नानांनी यासोबत इतर आठवणीही सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT