nana patekar  sakal
Premier

Nana Patekar:'मी किती नालायक होतो...' मोठ्या मुलाच्या निधनावर पहिल्यांदाच बोलले नाना पाटेकर; म्हणाले- 'मला लाज वाटायची की'

Nana Patekar First Son: बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलाच्या निधनावर भाष्य केलं आहे.

Payal Naik

Nana patekar: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच मात्र ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहिले. त्यांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांनी मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं. सध्या नाना सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे त्यांनी दिलेली मुलाखत. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. या मुलाखतीत ते पाहिल्यांदाच त्यांच्या मुलाच्या मृत्यूविषयी बोलताना दिसले. आपण कसे बाप होतो हे सांगताना ते भावुक झाले.

नानांनी नुकतीच 'लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना मोठ्या मुलाच्या निधनाचं दुःख कसं सहन केलं हे सांगताना ते म्हणाले, 'माझा मोठा मुलगा जन्मापासूनच आजारी होता. त्याला बरेच प्रॉब्लेम होते. एका डोळ्याची समस्या होती, त्याला दिसत नव्हतं. जन्मापासून त्याचा ओठ फाटलेला होता. त्याला तसं पाहून मी काय विचार करायचो बघा. म्हणजे मी किती नालायक माणूस होतो बघा हा त्याला पाहून पहिली गोष्ट माझ्या मनात आली की लोक काय म्हणतील? नानाचा मुलगा असा कसा आहे? लोक काय विचार करतील? हे विचार आधी माझ्या मनात आले त्याला पाहिल्यावर.'

नाना पुढे म्हणाले, 'त्याचं नाव दुर्वास होतं. त्याला काय वाटतंय याच्याशी मला काहीच देणं घेणं नव्हतं. दुर्वास ऋषींच्या नावावरून नाव ठेवलं होतं. अडीच वर्षाचा असताना तो गेला. पण या अडीच वर्षात त्याने खूप काही शिकवलं. काही ट्रिगरिंग पॉईंट ते आहेत. पण काय करणार? आयुष्यात काही गोष्टी घडतात.” नाना यांच्या पत्नी नीलकांती या तेव्हा बँकेत नोकरी करायच्या. नानांच्या अभिनय क्षेत्रात येण्यासाठी नीलकांती यांनी खूप मदत केली. आज मी जो आहे तो तिच्यामुळे आहे असं नाना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT