Naseeruddin Shah sakal
Premier

Naseeruddin Shah: मुस्लिमांनो, हिजाब आणि सानिया मिर्झाच्या स्कर्टची चिंता सोडा... नसीरुद्दीन शाह यांचं बेधडक वक्तव्य

Naseeruddin Shah On PM Modi: अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह कायमच बिनधास्तपणे आपली मतं मांडताना दिसतात. बॉलिवूड असो किंवा देशाचं राजकारण नसीरुद्दीन नेहमीच बेधडकपणे आपली बाजू मांडताना दिसतात. आता पुन्हा एकदा त्यांची अशीच एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ज्यात ते देशातील मुसलमानांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक गोष्टींवर बोलताना दिसले. त्यांच्या या मुलाखतीची सध्या प्रचंड चर्चा होतेय. या मुलाखतीत त्यांनी मुस्लिम बांधवाना इतर गोष्टी सोडून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

मोदींचे मगरीचे अश्रू

पत्रकार करण थापर याला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन म्हणाले, 'मोदी गेल्या काही वर्षांपासून कमी समजूतदारपणा असलेल्या गोष्टी बोलत आहेत. त्यांना जर असं वाटतं की त्यांना देवाने पाठवलंय तर सगळ्यांनी त्यांना घाबरलं पाहिजे. जेव्हा मला कळालं की भाजपाने आपलं बहुमत गमावलंय मी खूप आनंदी झालो. आता पंतप्रधान पुन्हा जुने मोदी नाही बनू शकत. ते एवढे चांगले अभिनेते नाहीयेत. त्यांचे मगरीचे अश्रू आणि हसू मला कधीच त्यांच्या बाजूने वळवू शकणार नाही.'

मोदींनी इस्लामिक टोपी घालावी

नसीरुद्दीन पुढे म्हणाले,'मला पंतप्रधान मोदींना इस्लामिक टोपी घातलेलं पाहायचं आहे. त्यामुळे देशातील मुस्लिम लोकांना एक संदेश मिळेल की ते कधीच त्यांच्या विरोधात नव्हते. ते त्यांचे शत्रू नाहीयेत. त्यामुळे खूप मदत होईल.'

मुस्लिम बांधवाना सल्ला

यासोबतच त्यांनी देशातील मुस्लिम नागरिकांना देखील सल्ला दिला. ते म्हणाले, 'मुसलमानांनी आता मदरशांऐवजी आणि सानिया मिर्झाच्या स्कर्ट ऐवजी शिक्षण आणि नवीन विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे. मोदींचा विरोध करणं खूप सोपं आहे. खरं तर हे आहे की मोदी सत्तेत येण्यापूर्वीही या देशात खूप काही चुकीचं होतं. या देशात धर्मांमधील वैमनस्याची भावना नेहमीच होती.' आता नसीरुद्दीन यांची ही मुलाखत प्रचंड चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT