navra maza navsacha 2  esakal
Premier

Navra Maza Navsacha 2 Collection: पहिल्याच दिवशी 'नवरा माझा नवसाचा २' चा बॉक्स ऑफिसवर धुरळा; वाचा कमाई

Navra Maza Navsacha 2 Box Office Collection : मराठी चित्रपट 'नवरा माझा नवसाचा २' ने पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे.

Payal Naik

१९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील प्रत्येक वाक्य प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही ते डायलॉग चाहते आवडीने बोलतात. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या तोंडी असतात. अतिशय चांगले कलाकार आणि गुंतवून ठेवणारी कथा यामुळे हा चित्रपट कल्ट क्लासिक म्हणून गणला जातो. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

पहिल्या दिवसाची कमाई

या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी आणि सुप्रिया पिळगावकर यांनी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. तर काल २० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात आला. त्याचाही या चित्रपटाला फायदा झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच चांगला प्रतिसाद लाभला आहे. sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १ कोटी ७० लाखांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आता पुढे शनिवार रविवार असल्याचा या चित्रपटाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

दुसरीकडे नवरा माझा नवसाचा प्रमाणेच नवरा माझा नवसाचा दोन मध्येही एका नवसाची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा हा प्रवास एसटी मधून नाहीये. तर तो प्रवास आहे कोकण रेल्वेमधून. सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, सुप्रिया, निर्मिती सावंत यांच्यासारखे सुपरस्टार. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासारखा दिग्गज नट. सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, हरीश दुधाणे यांच्यासारखे कलाकारही चित्रपटात आहेत. आता चित्रपटाच्या एकूण कलेक्शनवर सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT