Navra Maza Navsacha 2 Movie Review sachin pelgaokar ashok saraf Entertainment News cdj98  sakal
Premier

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅटर्न वेगळा!

Sachin Pelgaokar Latest Movie: प्रत्येकाने पहावा असा कौटुंबिक प्रवास

Chinmay Jagtap

Navra Maza Navsacha 2 Movie Review: गेल्या महिनाभरापासून ज्या चित्रपटाची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती तो अखेर रिलीज झाला. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूम धडाक्यामध्ये स्वागत करण्यात आलं. संपूर्ण कुटुंब हा चित्रपट बघायला जात असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अशातच हा चित्रपट नक्की कसा आहे? याची उत्सुकता प्रत्येकाला आहेच. (Navra Maza Navsacha 2 Movie Review)

चित्रपटाची उजवी बाजू किंबहुना चित्रपट का बघावा तर यामध्ये केलेल्या अभिनयामुळे. सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, सुप्रिया पिळगावकर यांच्यासारखे सुपरस्टार. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासारखा दिग्गज नट. सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, हरीश दुधाडे यांच्यासारखे आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देणारे अभिनेते यांच्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल यात काहीच वाद नाही. (swapnil joshi, supriya pilgaonkar, sachin pilgaonkar)

तर दुसरीकडे नवरा माझा नवसाचा प्रमाणेच नवरा माझा नवसाचा दोन मध्येही एका नवसाची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा हा प्रवास एसटी मधून नाहीये. तर तो प्रवास आहे कोकण रेल्वेमधून. सर्वसामान्य कोणणी माणसासाठी कोकण रेल्वे हा जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेमधून प्रवास करताना येणारी मज्जा. तो नोस्टेलच्या आपल्याला या चित्रपटामध्ये प्रवासादरम्यान पाहायला मिळतो. वेळोवेळी कोणतं ना कोणतं छोटा का होईना पात्र येतं आणि आपली छाप सोडून जातं.

तर दुसरीकडे नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट पाहायला गेलो तर हा एक सुंदर कॉमेडी कौटुंबिक चित्रपट आहे. कोणत्याही साधारण मराठी व्यक्तीला ज्या प्रकारचा चित्रपट अपेक्षित असतो, ज्या प्रकारची कॉमेडी अपेक्षित असते त्या प्रकारचीच कॉमेडी यात करण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंब जाऊन हा चित्रपट बघू शकतो. या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो.

मात्र जर कम्पॅरिझन झालं, म्हणजेच नवरा माझा नवसाचा एक की दोन नक्की कोणता चांगला? या फंदात आपण प्रेक्षक म्हणून पडलो तर आपल्याला हा चित्रपट आवडणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच कारण म्हणजे या चित्रपटांमध्ये काही प्रमाणात केलेले विनोद. हे विनोद नक्की का केलेत असा प्रश्न पडू शकतो. यामुळे या चित्रपटाकडे एक स्वातंत्र चित्रपट म्हणून पाहायला तर चित्रपटाची मजा जास्त घेता येईल.(navra maza navsacha 1 Vs navra maza navsacha 2)

सरते शेवटी, प्रवासात येणारी मज्जा, अभिनयाची तुफान बॅटिंग, खराखुरा मराठी चित्रपट आणि कुटुंबासोबत सोबत चित्रपट बघण्याची इच्छा असेल तर नक्की बघा नवरा माझा नवसाचा 2

२.५ स्टार रेटिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT