sacred games  sakal
Premier

Sacred Games: प्रेक्षकांची निराशा! 'सेक्रेड गेम्स'चा तिसरा सीझन नाही येणार; नवाजुद्दीन सिद्दीकीने स्वतः सांगितलं कारण

Nawazuddin Siddiqui says there no sacred games 3: प्रेक्षक 'सेक्रेड गेम्स'च्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते मात्र आता हा सीझन येणार नसल्याचं समोर येतंय.

Payal Naik

Nawazuddin Siddiqui On Sacred Games 3: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमधूनच त्याच्या ओटीटीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती. या थ्रिलर वेबसीरिजमध्ये त्याने गणेश गायतोंडे हे पात्र साकारलं होतं. या सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर आलेल्या 'सेक्रेड गेम्स २' ला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता चाहते या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. तिसरा सीझन कधी येणार असा प्रश्न विचारला जातोय. आता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

नवाजुद्दीनने ओटीटी प्ले ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन येणार नाहीये. त्याने यामागचं कारणंही सांगितलं. याबद्दल बोलताना नवाजुद्दीन म्हणाला,'दोन सीझननंतर माझ्या दिग्दर्शकालाही कंटाळा आला आणि तिसरा सीझन बनवू नये असं वाटलं. आणि सर्व अभिनेत्यांनीसुद्धा सीझन 3 ला नाही म्हटलं. जे झालंय ते आता जाऊद्या. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने देखील तेच सगळं पुन्हा करू इच्छित नाहीत. क्रिएटिव्ह लोकांना सहज कंटाळा येतो. अनेकांनी मला 'सेक्रेड गेम्स'चा तिसरा सीझन बनवायला सांगितलं. पण भाऊ, 'सेक्रेड गेम्स'चा तिसरा सीझन येणार नाही. जे संपलं ते आता संपलं.'

नवाजुद्दीन या मुलाखतीत सीरिजमध्ये वापरण्यात आलेल्या शिव्यांबद्दलही बोलला आहे. तो म्हणाला, 'आम्हीच या गोष्टीची सुरुवात केली होती. पण आता कुणी मला घाणेरड्या शिव्या असलेली सीरिज करायला सांगेल तर मी त्याला नकार देईन. 'सेक्रेड गेम्स'मध्ये नवाजुद्दीनशिवाय सैफ अली खान, कुबरा सैत, एलनाज नूरानी, ​​कल्की केकलन, पंकज त्रिपाठी, राजश्री देशपांडे आणि राधिका आपटे दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : पिकविमा जुलैमध्ये सुरू करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT