Premier

Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यात वाद, मेकअप वरुन स्पर्धक वैतागले तर बिग बॉसदेखील...

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये वर्षा उसगावकर आणि इतर स्पर्धकांमध्ये मेकअपवरून जोरदार भांडण झालं.

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची सगळ्यांनाच उत्सुकता होती. यंदा नव्या होस्टसह हटके सिझन असल्याचं बोललं जात होतं आणि नुकतीच बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला सुरुवात झाली आहे. या नव्या सीझनमध्ये १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात दिग्गज कलाकार, किर्तनकारसह इन्फ्लुएर्ससचा देखील समावेश आहे. आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या एव्हरग्रीन वर्षा उसगांवकरदेखील यंदा या खेळात सहभागी झाल्या आहेत. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी वर्षा यांच्यामुळे राडा झाला आहे.

पहिल्याच दिवशी घरात पाणी नसल्याने स्पर्धकांची चिडचिड झाली तर दुसरीकडे वर्षा उसगांवकर यांच्यामुळे देखील इतर स्पर्धकांना बराच वेळ तात्काळत बसावं लागलं. बिग बॉसच्या आदेशासाठी लिव्हिंग रुममध्ये सगळे स्पर्धक जमलेले असताना वर्षा उसगांवकर मात्र त्यांचा मेकअप करत होत्या. स्पर्धक निकी तांबोळीला मात्र हे सहन झालं नाही आणि तिने तावातावाने वर्षा यांच्याकडे जात त्यांना लवकर येण्यास सांगितलं.

याचवेळी निकी तांबोळी आणि वर्षा यांच्यात भांडत होताना दिसलं. निकी आणि वर्षा यांची तू तू मै मै होताना पाहायला मिळालं. निकी यावेळी वर्षा उसगांवकर यांना म्हंटल की, "तुम्ही कृपया नंतर मेकअप करा". निकीच्या या बोलण्यावर वर्षा ताईंनीही तिला लगेच उत्तर दिलं. वर्षा ताई म्हटल्या की, "मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे... तू व्यवस्थित तयार झालीस".

तेव्हा यंदाच्या भागात निकी आणि वर्षा ताई यांच्यातला वाद पाहायला मिळणार आहे. शिवाय बिग बॉस देखील वर्षा उसगांवकर यांच्यासाठी थांबल्याचं पाहायला मिळतय. शिवाय इतर स्पर्धकही वर्षा उसगांवकर यांना लवकर तयार होण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत. घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर बिग बॉस आदेश देणार आहेत. त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व सदस्य बेडरुममध्ये मेकअप करणाऱ्या वर्षांताईंना बाहेर बोलवताना दिसत आहेत.

निकी तांबोळी ही हिंदी बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये दिसली होती. त्या सीझनमध्येही निकीचा अनेक सदस्यांसोबत वाद होताना दिसला होता. तेव्हा मराठी बिग बॉसमध्ये निकी काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवाय वर्षा उसगांवकर यांना बिग बॉस काय आदेश देतील ? निकी तांबोळी नंतर इतर सदस्य देखील वर्षा ताईंसोबत वाद घालतील का ? या सगळ्या गोष्टी यंदाच्या बिग बॉस मराठीच्या भागात पाहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT