Premier

Entertainment News: शिवानी पाठोपाठ 'या' दोन जोड्यांनी उरकला साखरपुडा, यातील एका अभिनेत्याची होणारी बायको आहे सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर

Entertainment News:

priyanka kulkarni

Entertainment News: सध्या सिनेइंडस्ट्रीत जोरदार लगीनघाई सुरु झालीये. अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अंबर गणपुले (Ambar Ganpule) यांच्या साखरपुड्याची चर्चा सगळीकडे गाजत असतानाच मराठी इंडस्ट्रीतील आणखी दोन जोड्यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला. सोशल मीडियावर या दोन्ही साखरपुड्याची चर्चा जोरदार सुरु आहे.

अभिनेता डॉ. निखिल राजेशिर्केने (Nikhil Rajeshirke) काल म्हणजे 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुपचूप साखरपुडा केला. जवळचा मित्रपरिवार आणि कुटूंब यांच्या उपस्थितीत निखिलचा साखरपुडा पार पडला. त्याचा साखरपुडा थाटात पार पडला असला तरीही सोशल मीडियावर त्याने साखरपुड्याचे फोटोज शेअर केले नाहीयेत. अभिनेत्री रेश्मा शिंदेने निखिलच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्याच अभिनंदन केलं. निखिलने सोशल मीडियावर साखरपुड्याबाबत कोणतीही बातमी शेअर न केल्यामुळे त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयी कोणतीही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचू शकली नाहीये.

Nikhil Rajeshirke

निखिलच्या साखरपुड्याची बातमी ताजी असतानाच आणखी एका मराठी अभिनेत्याने साखरपुडा उरकला. झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतून श्रीनुच्या भूमिकेत घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक गावकरने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनालीसोबत साखरपुडा केला. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. अभिषेकची भावी बायको सोनाली ही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे तिचा मित्र श्रुतिकसोबतचे फनी रील्स खूप व्हायरल होत असतात. कुटूंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत सोनाली आणि अभिषेकचा साखरपुडा थाटात पार पडला. त्यांनी केलेला डान्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला.

काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिषेकने तो सोनालीसोबतचा फोटो शेअर करत त्यांचं रिलेशन जाहीर केलं होतं. त्यांच्या या कबुलीने अनेकांना सुखद धक्का बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT