nikki tamboli and arbaaz patel  esakal
Premier

घराबाहेर येताच डिनर डेटला पोहोचले निक्की अरबाज; पण नेटकरी करतायत तिच्याबद्दल विचारणा, म्हणतात- ती कुठेय?

Nikki Tamboli Arbaaz Patel Spotted For Dinner Date: यावेळचा बिग बॉस मराठी गाजला तो निक्की तांबोळीमुळे. आता घराबाहेर जाताच निक्की आणि अरबाज डिनर डेटवर एकत्र दिसले.

Payal Naik

Latest Intertainment News in Marathi: लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' ने गेले दोन महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. हा सीझन गाजला त्यात निक्की तांबोळी हीचा मोठा वाटा होता असं म्हणायला हरकत नाही. घरातली निक्की आणि अरबाज यांची मैत्री चांगलीच गाजली. जेव्हा अरबाज घराबाहेर झाला तेव्हा निक्कीला खूप वाईट वाटलं होतं. ती घरात रडत होती. त्यांची वाढलेली जवळीक ही सगळ्यांनाच दिसत होती. मात्र निक्की तिसऱ्या क्रमांकावर घराबाहेर झाली. त्यानंतर आता निक्की आणि अरबाज हे एकत्र दिसले आहेत.ते दोघेही डिनर डेटसाठी गेले होते आणि तिथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या व्हिडिओवर अरबाजचे चाहते निरनिराळ्या कमेंट करत आहेत.

घरात आलेल्या निक्कीच्या आईने अरबाजचा साखरपुडा झाला असल्याचं सांगितलं होतं. मात्र अरबाजने घरात येताच हे खोटं असल्याचं सांगितलं. त्याने निक्कीला मिठी मारत सगळे गैरसमज दूर केले. आता 'बिग बॉस मराठी ५' मधून बाहेर पडल्यावर निक्की आणि अरबाज पुन्हा एकत्र आले आहेत. निक्की आणि अरबाज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात ते एका रेस्ट्रॉरंट मधून बाहेर निघताना दिसत आहेत. ते पापाराझींना पोज देऊन नंतर गाडीत जाऊन बसतात. आता हा व्हिडीओ पाहून नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेक नेटकरी अरबाजच्या आधीच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारणा करत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'याची आधीची गर्लफ्रेंड लिझा होती ना? ती कुठे गेली आता. हिच्यासोबत तो अजिबात चांगला दिसत नाहीये.' आणखी एकाने लिहिलं, 'आधी अरबाज वाघ होता आता निक्कीच्या मागे लागून अगदी मांजर झालाय.' आणखी एकाने लिहिलं , 'काही दिवसांनी अरबाज निक्कीलादेखील सोडून जाईल.' अशा अनेक कमेंट नेटकरी करत आहेत. तर 'बिग बॉसच्या घरातील प्रेम फार काळ टिकत नाही असं म्हटलं जातं. आता निक्की आणि अरबाज यांचं नातं किती दिवस टिकतं याकडे नेटकऱ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT