Bigg Boss Marathi Season 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 Day 2 : निक्कीने केला वर्षा उसगांवकरांचा अपमान, म्हणते "तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती.."

Bigg Boss Season Marathi 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. निक्कीने वर्षा यांचा पुन्हा एकदा अपमान केला.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचं नवं सीझन नुकतच सुरु झालय. प्रत्येक सीझन प्रमाणे यंदाचं बिग बॉस मराठीचं सीझन देखील लक्षवेधी ठरतय. यंदा बिग बॉस मराठीच्या घरात १६ महारथी स्पर्धक गेलेत. प्रत्येकाची एक वेगळी शैली आणि हटके अंदाज असल्यामुळे प्रेक्षकांना यंदाच्या सीझनमध्ये काय धमाल येतेय याची उत्सुकता आहे. यातच अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉसने हा खेळ रंजक बनवला आहे.

पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर यांना मेकअप करण्यासाठी वेळ लागला होता. बिग बॉसच्या घरात पाणी आलं नसल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. त्यातच बिग बॉसच्या आदेशासाठी लिव्हिंग एरियामध्ये सगळे स्पर्धक बिग बॉसच्या आदेशाची वाट पाहत असताना वर्षा उसगांवकर मात्र मेकअप करत होत्या. यावरुन निकी तांबोळीचा वर्षा ताईंसोबत वाद झाला होता. आता पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी देखील निकी आणि वर्षा ताईंमध्ये वादाची ठिणगी पेटलीय.

बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर यांच्यामुळे गोंधळ उडालाय. वर्षा उसगांवकर यांनी निवडल्याप्रमाणे त्यांना पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने त्या झोपल्या. मात्र वर्षा उसगांवकर यांच्यामुळे इतर सदस्यांना त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो नुकताच समोर आलाय. या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकदा निक्की आणि वर्षा यांच्यात वाद झालाय. बिग बॉसने दिलेल्या आदेशाप्रमाणे घरातील सदस्यांना झोपण्यासाठी बेडचा वापर करण्यावर सक्त मनाई करण्यात आली. तर सदस्यांना बेडवर न झोपता आता चक्क जमिनीवर झोपावं लागणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांची चिंता आता वाढलीय. पहिल्या दिवशी पाण्यामुळे झालेली गैरसोय ते आता चक्क जमिनीवर झोपावं लागणार असल्यानं स्पर्धकांचा गोंधळ उडालाय. मात्र या सगळ्याचं खापर निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांच्यावर फोडलय.

वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉसकडे माफी मागत चुकून झालं असं देखील म्हटल. मात्र निक्कीने सगळा राग वर्षा यांच्यावर काढलाय. ती म्हंटली की "आम्हाला भोगावं लागतंय..तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय". यावर वर्षा म्हणतात,"माझ्या एकटीमुळे नाही". त्यावर निक्की म्हणते,"तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती".

वर्षा उसगांवकर या मनोरंजन विश्वातील एक अनुभवी अभिनेत्री आहेत. मराठीसह हिंदीतही त्यांनी काम केलय. निक्कीने वर्षा यांचा केलेला अनादर पाहुन सोशल मिडीयावर प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे. तेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय घडतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT